घरक्रीडाIPL 2024 : महेंद्रसिंह धोनीऐवजी मराठमोळा ऋतुराज गायकवाड करणार CSKचे नेतृत्व

IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीऐवजी मराठमोळा ऋतुराज गायकवाड करणार CSKचे नेतृत्व

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उद्याचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पाहायला मिळणार अशी चर्चा होती. मात्र या क्रिकेटप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उद्याचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पाहायला मिळणार अशी चर्चा होती. मात्र या क्रिकेटप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. यंदाच्या आयपीएलच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करणार नसून मराठमोळा ऋतुराज गायकवाड करणार आहे. याबाबत आयपीएलच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. (ruturaj gaikwad new captain of CSK will be lead instead of Mahendra Singh Dhoni in ipl 2024)

आयपीएलचे सामने सुरू होण्यापूर्वी आयपीएल स्पर्धेतील सर्व संघाच्या करणधारांचे नुकताच फोटो शूट झाले. या फोटो शूटमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसत आहे. तसेच, भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड असणार आहे.

- Advertisement -

काही दिवसांपू्र्वी एमएमस धोनीने फेसबूक पोस्ट करत आपण नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे धोनी कर्णधारपद सोडून मेंटोरच्या भूमिकेत दिसणार का असा कयास चाहत्यांनी लावला आहे. मात्र अखेर चाहत्यांच्या अंदाजांना पूर्णविराम लागला असून यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी कर्णधाराच्या भूमिकेत नसून ऋतुराज गायकवाड असणार आहे.

दरम्यान, 2022 आयपीएल हंगामातही चेन्नई संघाने स्पर्धेच्या दोन दिवस आधी रवींद्र जडेजा याला कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावेळी चेन्नईच्या संघाला मोठा फटका बसला होता. सातत्याने पराभवांचा सामना करावा लागल्याने गुणतालिकेत चेन्नईचा संघ शेवटी होता.

- Advertisement -

भारतीय क्रिकेट चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहातायत त्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा सतरावा हंगाम आहे. गेल्या हंगामात अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आता सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स सज्ज झाली आहे.


हेही वाचा – IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; दुखापतीमुळे दोन खेळाडू संघाबाहेर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -