घरक्रीडाRuturaj Gaikwad : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 32 धावा करताना ऋतुराजने टी-20 मध्ये इतिहास...

Ruturaj Gaikwad : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 32 धावा करताना ऋतुराजने टी-20 मध्ये इतिहास रचला

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शुक्रवारी (1 डिसेंबर) रायपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या 32 धावा करताना मोठी कामगिरी केली आहे. तो आता टी-20 सामन्यात भारतासाठी सर्वात जलद 4 हजार धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमाकांचा फलंदाज ठरला आहे, तर जगातील चौथा क्रमाकांचा फलंदाज ठरला आहे. (Ruturaj Gaikwad made history in T20Is with just 32 runs against Australia)

ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात 28 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने फक्त 32 धावा केल्या. मात्र या धावा करताना त्याने विकेटकीपर फलंदाज केएल राहुलला मागे टाकत भारतासाठी सर्वात जलद 4 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने 116 डावात 4 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी केएल राहुलने 117 डावात 4 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. यानंतर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमाकांवर आहे. त्यांने 138 डावात टी-20 मध्ये 4 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  IPL 2024: IPL लिलावासाठी 1166 खेळाडूंची नोंदणी; मिचेल स्टार्कचाही समावेश

कमी डावात 4 हजार धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 4 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आहे. त्याने केवळ 107 डावांमध्ये 4 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. खिस्र गेलनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शॉन मार्श (113) दुसऱ्या क्रमांकावर, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (115) आणि न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (116) पाचव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

ऋतुराज गायकवाडची टी-20 कारकीर्द

26 वर्षीय ऋतुराज गायकवाडच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने 490 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 37.69 होती तर, त्याचा स्ट्राइक रेट 142.02 इतका होता. त्याचबरोबर त्याने 121 टी-20 सामन्यांच्या 116 डावांमध्ये 5 शतके आणि 27 अर्धशतकांच्या मदतीने 4025 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 38.70 होती तर, त्याचा स्ट्राइक रेट 139.12 इतका होता.

हेही वाचा – नोव्हेंबर महिन्यात GST कलेक्शनमध्ये नोंदवली मोठी वाढ, सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा

भारताने टी-20 मालिका जिंकली

दरम्यान, शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिय संघ 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 154 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 3-1 अशी जिंकली आहे. आता बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघ 4-1 ने विजय मिळवणार का, हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -