Homeक्रीडाSA vs AUS Semi Final : अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत...

SA vs AUS Semi Final : अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेची धडक; ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत पराभव

Subscribe

अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना झाला. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्धा ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 6 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे.

मुंबई : अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना झाला. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्धा ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 6 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. हा अंतिम सामना रविवार 2 फेब्रुवारीला होणार आहे. (SA vs AUS Semi Final Under 19 womens world cup 2025 south africa won by 5 wickets and qualify for final)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा सामना आता आंतिम सामन्यात भारतीय संघ विरुद्ध इंग्लंड यांच्यातील विजयी संघाविरुद्ध होणार आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर जेम्मा बोथा हीने सर्वाधिक 37 धावांचं योगदान दिलं. कर्णधार कायला रेनेके हीने 26 धावा जोडल्या. तर कराबो मेसो हीने 19 रन्स केल्या. तसेच इतरांनीही चांगली खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून लुसी हॅमिल्टन आणि हसरत गिल या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर क्लो एन्सवर्थ हीने एक विकेट मिळवली. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या मेन्स आणि वूमन्स या दोन्ही सिनिअर संघानंतर आता अंडर 19 वूमन्स संघानेही टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक दिली आहे.

विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सिनिअर मेन्स आणि वूमन्स संघाला अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागल्याने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग झालं होतं. मात्र आता अंडर 19 टीमने दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप जिंकावा, अशी आशा त्यांच्या क्रिकेट चाहत्यांना असणार आहे. दक्षिण आफ्रिका वूमन्स संघाला 20 ऑक्टोबर 2024ला वूमन्स टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने 32 धावांनी पराभूत केलं होतं. तर त्याआधी मेन्स भारतीय संघाने 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेवर अंतिम सामन्यामध्ये 7 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप उंचावला होता.

दरम्यान ऑस्ट्रेलियाची अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 27 जानेवारी 2023 रोजी इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर उपांत्य फेरीच्या समान्यात 3 धावांनी विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग 11 : कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, फे काउलिंग, कराबो मेसो (विकेटकीपर), मिके व्हॅन वुर्स्ट, सेशनी नायडू, लुयांडा न्झुझा, अ‍ॅशले व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी आणि न्थाबिसेंग निनी

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : लुसी हॅमिल्टन (कर्णधार), ग्रेस लायन्स (विकेटकीपर), इनेस मॅककॉन, काओइमहे ब्रे, एलेनोर लारोसा, हसरत गिल, एला ब्रिस्को, क्लो एन्सवर्थ, लिली बॅसिंगथवेट, टेगन विल्यमसन आणि ज्युलिएट मॉर्टन.


हेही वाचा – Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत मेघालयची दाणादाण, नोंदवला नकोसा विक्रम