Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा सचिनने कोरोनाला षटकार मारलाच!

सचिनने कोरोनाला षटकार मारलाच!

२ एप्रिलला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Related Story

- Advertisement -

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे जगभरातील असंख्य चाहते चिंतेत होते. काही दिवसांपूर्वी सचिनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आता या चाहत्यांची काळजी मिटली असून सचिन गुरुवारी पुन्हा घरी परतला आहे. सचिनला २७ मार्चला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर २ एप्रिलला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. सचिनला गुरुवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. याबाबतची माहिती त्याने स्वतःच ट्विटरच्या माध्यमातून दिली.

- Advertisement -

‘मी आताच हॉस्पिटलमधून घरी परतलो आणि अजून काही काळ आयसोलेशनमध्ये राहून विश्रांती घेणार आहे. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार,’ असे सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. मागील शुक्रवारी सचिनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही सचिनने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती चाहत्यांना दिली होती. ‘शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी तुम्हा सर्वांचे आभार. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. काही दिवसांतच मला पुन्हा घरी परत जाता येईल अशी आशा आहे,’ असे त्यावेळी सचिन म्हणाला होता.

- Advertisement -

 

- Advertisement -