घरक्रीडाक्रिकेटने हळूहळू ग्रामीण भागातही पाय रोवले- सचिन तेंडुलकर

क्रिकेटने हळूहळू ग्रामीण भागातही पाय रोवले- सचिन तेंडुलकर

Subscribe

क्रिकेटचे मार्गदर्शन ग्रामिण भागापर्यंत पोहचावे यासाठी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने तेंडुलकर मीडलसेक्स ग्लोबल अकादमीची स्थापना केली आहे.

तेंडुलकर मीडलसेक्स ग्लोबल अकादमीचे आज (१ नोव्हेंबर) नवी मुंबईत उदघाटन करण्यात आली. हळूहळू शहराबरोबरच ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी इतर भागांत पाय रोवले जातील. ग्रामीण भागात चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी अकादमी प्रयत्नशील असणार आहे. तिथे अकादमीला किती वाव मिळेल. आजूबाजूचा परिसर कसा असेल या बाबी लक्षात घेतल्या जातील असे भारतरत्न सचिन तेंडुलकरने यावेळी सांगितले. नवी मुंबई नेरुळ येथील डी.वाय पाटील स्टेडियमवर आयोजित केलेल्या तेंडुलकर्स मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट अकादमीची गुरुवारपासून सुरुवात झाली. त्या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ.डी.वायपाटील विद्यापीठाचे संचालक विजय पाटील, भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी, भारताचा माजी तेज गोलंदाज ऍबी कुरुविला तसेच विदेशी खेळाडू उपस्थित होते.
यावेळी त्याने आपल्या आकादमीबद्दल सांगितले सचिन म्हणाला की, ‘ही अकादमी मुलांना व मुलींना चांगले व्यवसपीठ मिळवून देणार आहे.प्रशिक्षक म्हणून इंग्लंडचे प्रशिक्षक देखील मुलांना शिकवणार आहेत. तसेच जी मुले चांगली आहेत मात्र त्यांना पैशाअभावी क्रिकेटचे प्रशिक्षण घेता येत नाही त्यांना मोफत प्रशिक्षण या अकादमीत दिले जात आहे. उत्तम तंत्रज्ञान भारतीय व विदेशी प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे. प्रत्येक मुलावर लक्ष ठेवले जाणार आहे.’

२४ वर्षांच्या अनुभवातून मुलांना शिकवणार

मिडलसेक्स काऊंटी क्लबला १५४ वर्ष झाली आहेत. तर मला २४ वर्षांचा अनुभव आहे. हा अनुभव आम्ही या मुलांना देण्याचे ठरवले आहे.क्रिकेटच्या तीनही प्रकारात कशा प्रकारे खेळायचे हे आम्ही शिकवणार आहोत.सचिन म्हणाला की, मी ज्यांच्याबरोबर खेळलो व त्यांनी त्यांचा काळ गाजवला आहे असे विनोद कांबळी,मिलिंद गुंजाळ,प्रदीप सुंदरन, संतोष जेरे हे खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. हा चार दिवसीय कॅम्प आहे.यातून पुढे मुले घडवली जाणार आहे. यातून इंग्लंड व ऑस्ट्रीलिया येथे मुलांना संधी मिळणार आहे.असेही यावेळी सचिनने सांगितले.यावेळी त्याने भारताचा उगवता तारा पृथ्वी शॉ तसेच गोलंदाज खालील अहमद यांची स्तुती केली. सध्या भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी तरुण खेळाडूंची चढाओढ सुरू आहे.अशी स्पर्धा झाली तरच उत्तमोत्तम खेळाडू आपल्याला मिळू शकतील असेही सचिनने यावेळी सांगितले.सचिन म्हणाला की; पृथ्वी हा चांगला खेळाडू असून त्याची बुद्धिमत्ता तल्लख आहे. त्याला एकदा सांगितले की तो लगेच ती गोष्ट आत्मसात करतो, या वयात त्याच्यात संयम असून ते एका चांगल्या खेळाडूचे लक्षण आहे.तर गोलंदाज खालील अहमद हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याला ही उज्वल भविष्य आहे.यावेळी भारताच्या पुढील काळात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौर्याविषयी भाष्य केले. ती म्हणाला की, ऑस्ट्रेलियात भारताला ओले कसब दाखवावे लागणार आहे. वर्ल्ड कप आधी आपल्या खेळाडूंना तेज खेळपट्ट्यांवर खेळायला मिळणार आहे, तेही ऑस्ट्रेलियासारख्या तेज गोलंदाजांसमोर ही चांगली संधी आहे.जेणेकरून उसळत्या खेळपाट्यांवर सराव आपल्याला वर्ल्डकपसाठी फायफेशिर ठरणार आहे असेही यावेळी सचिनने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -