घरक्रीडाSachin Tendulkar: मास्टर ब्लास्टरला आठवला निवृत्तीचा क्षण, कोहलीच्या इमोशनल गिफ्टचा सांगितला किस्सा

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टरला आठवला निवृत्तीचा क्षण, कोहलीच्या इमोशनल गिफ्टचा सांगितला किस्सा

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अमेरिकेचे पत्रकार ग्राहम बेंसिंगर यांच्याशी संवाद साधला. यावेळी सचिन तेंडलकरने आपल्या निवृत्तीच्या क्षणाची आठवण सांगितली. तसेच हे क्षण आठवताना विराट कोहलीने दिलेल्या इमोशनल गिफ्टचा खास किस्सा त्याने सांगितला आहे. विराटने दिलेले गिफ्ट काही दिवसानंतर सचिनने त्याला परत दिलं होतं.

मी खूप भावूक झालो होतो

१६ नोव्हेंबर २०१३ रोजी सचिन तेंडुलकरने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ९ वर्षांपूर्वीच्या दिवसाची आठवण करत सचिन म्हणाला की, मला अजूनही आठवते. मी ड्रेसिंग रूममध्ये जात असताना माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबू शकले नाहीत. कारण मला माहिती होतं की, मी निवृत्त होणार आहे. पण जेव्हा शेवटचा बॉल टाकला तेव्हा मी स्वत:ला सांगितले की, मी आता निवृत्त झालो आहे. आता मी माझ्या आयुष्यात कधीही आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मैदानात खेळण्यासाठी उतरू शकणार नाही. त्यावेळी मी खूप भावूक झालो होतो. त्यानंतर विराट माझ्याकडे आला आणि त्याने मला एक पवित्र धागा दिला. हा धागा त्याच्या वडिलांना त्याला दिला होता. मी तो धागा काही दिवसांसाठी माझ्याकडे ठेवला. नंतर मी तो विराटला परत केला. तो धागा खूप मौल्यवान गोष्ट असल्यामुळे मी त्याला परत दिला. कारण ते गिफ्ट माझ्यासाठी अगदी भावूक करून टाकणार होतं, असं सचिन म्हणाला.

- Advertisement -

मी माझ्या हृदयातल्या अगदी जवळची गोष्ट दिली – कोहली

रनमशीन विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानतो. विराट ग्राहम बेसिंगरच्या कार्यक्रमात उपस्थित होता. तिथे त्याने सचिनच्या निवृ्त्तावर चर्चा केली होती. मी माझ्या हृदयातल्या अगदी जवळची गोष्ट सचिनच्या निवृत्ती वेळी दिली होती, असं कोहली म्हणाला.

भारतात आपण मनगटावर लाल धागा बांधतो. माझे वडिलही असाच पवित्र धागा हातात घालायचे. त्यांनी मला तो धागा दिला होता. मी तो धागा नेहमी माझ्या बॅगेत ठेवायचो. परंतु सचिन जेव्हा निवृत्त झाला. तेव्हा मला वाटले की, सचिनला गिफ्ट देण्यासाठी माझ्याकडे दुसरी कोणतीही गोष्ट नाहीये, असं विराट म्हणाला.

- Advertisement -

सचिन तेंडुलकरने टीम इंडियासाठी २०० कसोटी सामने आणि ४६३ वनडे सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३४ हजारांहून अधिक धावा आहेत. आतापर्यंत त्याच्या धावांतील आकड्यांच्या जवळ एकही खेळाडू पोहोचलेला नाहीये.


हेही वाचा : Bird Flu : बर्ड फ्ल्यू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी, नागरिकांनी घाबरु नये; जिल्हाधिकारी नार्वेकरांचं आवाहन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -