Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा 'वेंगसरकरांच्या डोळ्यांत अश्रू' तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही, तेंडूलकरने दिला...

‘वेंगसरकरांच्या डोळ्यांत अश्रू’ तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही, तेंडूलकरने दिला आठवणींना उजाळा

Subscribe

सचिन तेंडूलकरने जुन्या आठवनींना उजाळा देताना दिलीप वेंगसरकरांच्या आठवणींचा किस्सा सांगितला आहे. त्याने वेंगसरकरांची कार्यशैली आणि त्यांच्यात असलेल्या क्रिकेट प्रेमाची आठवणही करून दिली. सचिनने सांगितले वानखेडे मैदानावर जो वेंगसरकरांच्या नावाचा जो स्टँड उभारला आहे. ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच त्याने कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. सचिनने वेंगसरकर सरांसोबत आपल्या अविस्मरणीय आठवणी असल्याचे सांगितले. माझे आणि वेंगसरकर सरांचे कसोटी सामन्यांसाठी नावं आले होते असे सचिन म्हणाला.

सचिनने जुन्या आठवणी ताज्या करताना सांगितले, वासु सरांसोबत पहिली भेट इंदोरमध्ये झाली होती. त्यावेळी २४ वर्षात मी कधीच भारतीय खेळाडूला फलंदाजी करताना बघितले नव्हते सर्वजण गोलंदाजी करायचे, वयाच्या १४ व्या वर्षी कपिल देव यांच्यासोबत खेळलो होतो. सोबतच वेंगसरकरांचे आपल्या जीवनातील स्थान सांगताना सचिनने वेंगसकरांमुळे माझ्या जीवनाला गती आल्याचे सांगितले. सीसीआरला फलंदाजी करताना वेंगसरकर सरांनी मला पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहिले होते. मला वेंगसरकरांनी बॅट दिली तेव्हा मी खूप भारावून गेलो होतो मी त्यांना धन्यवादही न बोलता तिथून निघालो, माझा पूर्ण गोंधळ उडाला होता मला संदीप पाटीलने आठवन करून दिली तेव्हा मी परत जाऊन सरांना धन्यवाद बोललो होतो.

- Advertisement -

त्यानंतर माझी रंजी ट्रॉफीसाठी निवड झाली, त्यातीलच सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे हरियाणा विरूध्द आम्ही रंजी ट्रॉफी खेळलो. आमचा शेवटचा बळी राहिला होता तो सामना आम्हाला एका धावेमुळे गमवावा लागला होता. आमचा शेवटचा गडी धाव काढताना बाद झाला होता. त्या सामन्यात वेंगसरकर सरांनी नाबाद अर्धशतक झळकावले होते तरीही आमचा सामन्यात पराभव झाला होता, त्या सामन्यातील वेंगसकर सरांची स्थिती मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी जेव्हा ड्रेसिंग रूमकडे कूच केली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याचे मी पाहिले आहे. त्यावरून माझ्या लक्षात आले की क्रिकेटवर प्रेम काय असतं, चिकाटी काय असते एवढ्या मोठ्या खेळाडूच्या देखील डोळ्यातून अश्रू कारण त्यावेळी वेंगसरकर सरांनी १०० हून अधिक कसोटी सामने खेळले होते. आणि तरीही ते मुंबईला खेळत होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी, अशा शब्दांत सचिनने वेंगसकरांच्या आठवनींना उजाळा दिला. सचिनने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार व्यक्त करत, मुंबईच्या सर्व संघाना शुभेच्छा दिल्या आहेत.


 

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -