घरक्रीडाOn This Day: सचिन तेंडुलकरने १०० वे शतक झळकावून रचला इतिहास, तरीही...

On This Day: सचिन तेंडुलकरने १०० वे शतक झळकावून रचला इतिहास, तरीही चाहत्यांची तुटली मनं

Subscribe

क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा आहे. कारण आजपासून ९ वर्षांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० वे शतक झळकावून इतिहास रचला होता. आशिया चषक २०१२ मध्ये सचिनने एका सामन्यात ११४ धावा केल्या होत्या. मात्र, सचिनच्या ऐतिहासिक खेळीनंतरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची मनं तुटली. तमिम इक्बाल आणि शकीब अल हसन यांच्या शानदार खेळीमुळे बांगलादेशने टीम इंडियाचा ५ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने ५० षटकांत पाच गडी गमावून २८९ धावा केल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये ५१ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकं झळकावली आहेत. मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँण्टिंगचा क्रमांक लागतो, पाँण्टिंगच्या नावावर ७१ शतकं आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीने ७० शतकं झळकावली आहेत.

- Advertisement -

सचिनने बांगलादेशविरुद्ध १४७ बॉल्समध्ये १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११४ धावांची खेळी केली. शतक ठोकण्यासाठी सचिन एकदम संथ गतीने खेळला होता. या सामन्यात सचिन व्यतिरिक्त विराट कोहलीने ६६ आणि सुरेश रैनाने ५१ धावांची तुफानी खेळी केली. भारताला निर्धारित ५० षटकात ५ गडी गमावून २८९ धावाच करता आल्या. बांगलादेशने तमीम इक्बाल ७०, झहरुल इस्लाम ५३, नासेर हुसेन ५४, शकीब अल हसन ४९ आणि मुशफिकुर रहीम यांच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर भारताचा ५ विकेट्स राखून पराभव केला.

सचिन तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० रोजी ग्वाल्हेर मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते. या सामन्यात सचिनने १४७ चेंडूत २०० धावांची नाबाद खेळी खेळली. या सामन्यात ४०० हून अधिक धावा सचिनने केल्या होत्या आणि हा सामना भारताने १५३ धावांनी जिंकला.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी पोलीस आयुक्तालयाकडून नव्या सूचना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -