घरक्रीडाMIला प्लेऑफमध्ये पाहून आनंद वाटतोय पण विराट... प्रवेशानंतर सचिन तेंडुलकरचं ट्वीट चर्चेत

MIला प्लेऑफमध्ये पाहून आनंद वाटतोय पण विराट… प्रवेशानंतर सचिन तेंडुलकरचं ट्वीट चर्चेत

Subscribe

आयपीएल 2023 मधील डबल हेडरचे सामने रंगीत दार झाले आहेत. अगदी शेवटच्या सामन्यांपर्यंत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 18 ओव्हर्समध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादनं दिलेलं 200 धावांचं मोठं आव्हानं मुंबईने सहज पार केलं आहे. त्यानंतर दुसरा सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. यावेळी गुजरात टायटन्सने आरसीबीवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यास मोठी संधी मिळाली. दरम्यान, MIला प्लेऑफमध्ये पाहून आनंद वाटतोय, असं ट्वीट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केलं आहे. त्यामुळे त्याच्या या ट्वीटची सगळीकडे चर्चा होत आहे.

काय आहे सचिनचं ट्वीट?

मुंबई पलटनसाठी चांगली बॅटिंग केल्याबद्दल सचिन तेंडुलकरने कॅमरुन ग्रीन आणि शुभमन गिलचं कौतुक केलं आहे. विराट कोहलीने सुंदर अशी लागोपाठ शतकं ठोकली होती. कारण त्याच्याकडे स्वत:ची पद्धत आणि एक खास शैली आहे. पण मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पाहून आनंद झालाय, असं सचिननं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

मुंबईनं सामनाही जिंकला आणि प्ले ऑफमध्ये आपलं स्थानही पक्कं केलं. परंतु प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांकडून मुंबईतील रस्त्यावर आणि गल्लोगलीत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच या जल्लोषाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

कोहलीची शतकी खेळी व्यर्थ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरली. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने 52 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले.


हेही वाचा : IPL Playoffs : RCBच्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा निराशा; मुंबईची प्लेऑफमध्ये


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -