घरक्रीडासचिन तेंडुलकरला क्रीडाविश्वातला ऑस्कर!

सचिन तेंडुलकरला क्रीडाविश्वातला ऑस्कर!

Subscribe

क्रीडा क्षेत्रात मानाचा म्हणून ओळखला जाणारा लॉरियस स्पोर्टींग मोमेंट २०००-२०२० हा पुरस्कार सचिन तेंडुलकरने पटकावला आहे. सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतल्यानंतरही एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मैदानातील कारकिर्द साऱ्या जगाने पाहिली. क्रीडा विश्वातील सर्वोच्च पुरस्कारने सचिन तेंडुलकरला गौरवण्यात आले आहे. क्रीडाविश्वातला ऑस्कर अशी लॉरियस पुरस्कारांची जगात ओळख आहे. त्याच लॉरियस पुरस्कारांचं काल जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये वितरण करण्यात आले. सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार विजेत्यांची निवड सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊन करण्यात आली. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील २० दावेदारांना नामांकन होतं. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे.

- Advertisement -

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत ६ विश्वचषक खेळले. त्यापैकी सहावा म्हणजे २०११ सालच्या विश्वचषकात भारताने बाजी मारली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरला संघ सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलून घेत मैदानाला विजयी फेरी मारली होती. यादरम्यान सचिन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. तसेच लॉरियसचा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार फॉर्म्युला वन रेसर हॅमिल्टन आणि फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांना जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली दिव्यांग जलतरणपटू नताली ड्यू टॉईटचं सचिनसमोर मुख्य आव्हान होतं. २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली होती. पण गेल्या दोन दशकांमधला क्रीडाविश्वातला सर्वोच्च मान म्हणून सचिनच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली. लॉरियस क्रीडा पुरस्कार जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -