हर्षा भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा! भोगलेंनी मजेशीर पद्धतीने मानले आभार

हर्षा भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त असंख्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच सचिननेही ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.

harsha bhogle and sachin tendulkar
हर्षा भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा
प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. भोगले यांची उत्कृष्ट समालोचक अशी ओळख आहे. त्यांच्यामुळे भारतामध्ये क्रिकेट समालोचनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. भोगले यांच्या समालोचनामुळे कोणत्याही क्रिकेट सामन्याची रंजकता अधिकच वाढते. विशेषतः भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची फलंदाजी आणि त्यावर भोगलेंचे समालोचन ही क्रिकेट रसिकांसाठी मेजवानीच असायची. त्यामुळे सोमवारी भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त असंख्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच सचिननेही ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.

तुमच्या मागोमाग आम्ही सगळे चालत आलो

सचिनने भोगले यांना वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या. ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हर्षा. येणारे वर्ष तुला उत्तम आरोग्याने आणि आनंदाने भरलेले जावो,’ असे सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. यावर भोगलेंनी मजेशीर प्रतिक्रिया दिली. ‘धन्यवाद सचिन. तुमच्या मागोमाग आम्ही सगळे चालत आलो. तुझ्यामुळे समालोचन करणे खूप सोपे झाले,’ असे म्हणत भोगले यांनी सचिनचे आभार मानले.

सचिनसह भारताच्या अन्य आजी-माजी क्रिकेटपटूंनीही हर्षा भोगलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.