घरक्रीडापीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल घेणार वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण

पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल घेणार वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण

Subscribe

कॉमनवेल्थ गेम्स नंतर कोच पुलेला गोपीचंदनी घेतला निर्णय

कॉमनवेल्थ गेम्सच्या अंतिम सामन्यात फुलराणी सायना नेहवालने तिची भारतीय प्रतिस्पर्धी पी व्ही सिंधूला हरवत गोल्ड मेडल मिळवले खरे; पण त्यानंतर या दोघींमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आले आहे. या दोन्ही बॅडमिंटनपटूंचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद दोघींना सध्या स्वतंत्र ठिकाणी प्रशिक्षण देतो आहे. यावरूनच दोघींमधील अंतर वाढल्याचे दिसते आहे.
पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या दोघीही भारतीय बॅडमिंटन स्टार असून, यांचा खेळ हा सर्व बॅडमिंटन रसिकांसाठी एक पर्वणीच असते, असे म्हणावे लागेल. मात्र या दोघींचे आपापसातील नाते तितके खास नाही. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समधील वूमन्स सिंगलमध्ये पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल आमने-सामने आल्या होत्या. सायनाने पी व्ही सिंधूला हरवत गोल्ड मेडल आपल्या नावावर केले. आणि यानंतर या दोघींतील अंतर वाढत गेले. पुलेला गोपीचंद या एकाच कोचकडून ट्रेनिंग घेणाऱ्या या दोघी याआधी एकाच सेंटरमध्ये खेळत होत्या मात्र या वादानंतर या दोघीनाही वेगवेगळ्या सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्याला प्राधान्य दिले.

कोचची खरी कसरत

दोन्ही खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी गोपीचंद यांना बरीच धावपळ करावी लागणार आहे. पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या दोघीही भारताच्या स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे दोघींच्या प्रशिक्षणावर लक्ष देताना ३८ वर्षीय गोपीचंद यांचे वेळापत्रक बरेच व्यग्र असणार आहे. यावेळी गोपीचंद यांनी सांगितले की “मी यापूर्वी पी व्ही सिंधू आणि सायनाला वेगवेगळ्या वेळापत्रकात प्रशिक्षण देत होतो. खेळाडूंचे हित पाहता आमच्या प्रशिक्षक संघाने हा निर्णय घेतला आहे. तसेच खेळाडूंना जसे जमेल तसे प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो”

- Advertisement -

यापूर्वीही होता दोघींमध्ये वाद

सिंधूचे बॅडमिंटन करिअर चांगल्या वेगात असताना सायनाने २०१४ मध्ये गोपीचंद यांची अॅकॅडमी सोडली होती. सायनाचे अॅकॅडमी सोडण्यामागील कारण सिंधूची चांगले चाललेले करिअर होते. यानंतर सायनाने विमल कुमार यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेतले आणि अव्वल रँक मिळवल्यानंतर पुन्हा पुढच्या प्रशिक्षणासाठी सायना गोपीचंद यांच्या अॅकॅडमीत परतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -