घरक्रीडाKorea Open : सायना स्पर्धेतून बाद

Korea Open : सायना स्पर्धेतून बाद

Subscribe

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिचा या फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराने २१-१५, १५-२१, २०-२२ असा पराभव केला. तिच्या पराभवामुळे भारतातही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

४ मॅच पॉईंट असतानाही पराभूत 

पाचव्या सीडेड सायना नेहवालला हा सामना जिंकण्यासाठी ४ मॅच पॉईंट होते. पण यापैकी एकही गुण तिला न मिळवता आल्याने सायनाने हा सामना गमावला. या सामन्याची सुरुवात सायनाने चांगली केली. तिने या सामन्याचा पहिला सेट २१-१५ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने पुनरागमन करत हा सेट २१-१५ असा जिंकला. त्यामुळे हा सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. या सेटमध्ये सायनाकडे २०-१६ अशी मोठी आघाडी होती. त्यामुळे ती हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण ओकुहाराने यापुढे सलग ६ गुण मिळवत हा सेट २२-२० असा जिंकला.

- Advertisement -

 


या पराभवानंतर सायना म्हणाली, “तिसऱ्या सेटमध्ये २०-१६ स्कोर असताना मी सामना जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला सामना जिंकण्यात अपयश आले. मी पुढच्या वेळी अधिक सराव करून मैदानात उतरीन.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -