Denmark Open : सायना दुसऱ्या फेरीत

भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

saina nehwal
सायना नेहवालचा आरोप
भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सायनाने हाँगकाँगच्या चेउन्ग यी हिचा २०-२२, २१-१७, २४-२२ असा पराभव केला.

असा झाला सामना 

या सामन्याची सुरुवात सायनासाठी चांगली झाली नाही. तिने या सामन्याचा पहिला सेट २०-२२ असा गमावला. पण दुसऱ्या सेटमध्ये तिने पुनरागमन केले. सायनाने दुसरा सेट २१-१७ असा जिंकला. त्यामुळे हा सामना तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. या चुसरशीच्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. पण मोक्याच्या क्षणी सायनाने आपला खेळ उंचावत हा सेट २४-२२ असा जिंकला. त्यामुळे तिने सामना जिंकत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.