घरक्रीडाKorea Open : सायना नेहवाल उप-उपांत्यपूर्व फेरीत

Korea Open : सायना नेहवाल उप-उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने कोरिया ओपन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने कोरिया ओपन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिने पहिल्या फेरीतील सामन्यात कोरियाच्याच किम ह्यो मिनचा २१-१२, २१-११ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सायनाने आपला सामना जिंकल्याने भारताचीही या स्पर्धेतील आव्हान कायम राहिले आहे.

असा झाला सामना

सायनाने या सामन्याची सुरुवात अप्रतिम केली. पहिल्या सेटमध्ये तिने आक्रमक खेळ दाखवत सुरुवातीलाच ६-२ अशी आघाडी मिळवली. तर मध्यंतरापर्यंत तिच्याकडे १२-३ अशी मोठी आघाडी होती. यानंतर किमने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतकी मोठी आघाडी कमी करण्यात तिला अपयश आल्याने तिने हा सेट २१-१२ असा गमावला. तर दुसऱ्या सेटमध्येही सायनाने चांगली सुरूवात केली. सुरुवातीलाच तिने ५-२ अशी आघाडी मिळवली. यानंतर सायनाने अधिकच आक्रमक खेळ करत १८-१० अशी मोठी आघाडी मिळवली. अखेर तिने २१-११ असा हा सेट जिंकत सामनाही जिंकला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -