घरक्रीडाWorld Badminton : वर्ल्ड चॅम्पियनशिपला मुकणार सायना नेहवाल, काय आहे कारण ?

World Badminton : वर्ल्ड चॅम्पियनशिपला मुकणार सायना नेहवाल, काय आहे कारण ?

Subscribe

जागतिक पातळीवर बॅडमिंटनमध्ये काही काळ अव्वल स्थानी राहिलेल्या सायना नेहवालच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे

जागतिक पातळीवर बॅडमिंटनमध्ये काही काळ अव्वल स्थानी राहिलेल्या सायना नेहवालच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती डिसेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नाही. अशी माहिती सायना नेहवालचा पत्नी आणि खेळाडू पी. कश्यप यांनी दिली. ही वर्ल्ड चॅम्पियनशिप याच महिन्यात १२ ते १९ डिसेंबर दरम्यान स्पेनमध्ये होणार आहे. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सायना नेहवालने या जागतिक स्पर्धेत आतापर्यंत एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. तसेच सायनाने ८ वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

सायनाचे पती कश्यप यांच्या माहितीनुसार, सायना नेहवालने वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून नाव माघारी घेतले आहे. ती सध्या मांडीच्या आणि गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. ती सध्या ही स्पर्धा खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. कश्यप यांनी सागिंतले की “सायनाला उबेर चषकात मांडीची दुखापत झाली होती. डेन्मार्कमध्ये ती तंदुरूस्त होती, मात्र दुखापत पूर्णपणे ठिक झाली नाही नव्हती. तर फ्रेंच ओपनमध्ये खेळताना आणखी दुखापत वाढली आणि त्रास होऊ लागला. आता आशा आहे की ती १० ते १५ डिसेंबरपर्यंत सरावासाठी पुनरागमन करेल”.

- Advertisement -

ऑक्टोबरमध्ये झालेल्या थॉमस आणि उबेर कप स्पर्धेच्या अर्ध्यातून सायनाला माघार घ्यावी लागली होती. यानंतर फ्रेंच ओपनमध्येही पहिल्या फेरीच्या सामन्यात दुखापत झाल्याने सायनाने गेम सोडून दिला होता.

२०१५ मध्ये रौप्य पदक जिंकले होते

सायना नेहवालने २००६ मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ती सलग वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळत आहे. ३१ वर्षीय सायना नेहवालने २०१५ मध्ये चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तेव्हा तिने अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनचा पराभव केला होता. यानंतर सायनाने ग्लास्गोमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते. तर २०१८ मध्ये सायनाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिचे दुसरे वैयक्तिक सुवर्ण जिंकले होते.

- Advertisement -

हे ही वाचा: http://IND vs NZ Test : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे बॉलिंग कोच यांचे ईशांत शर्माबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाले…


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -