घरक्रीडासलमान खानच्या संघात पाकिस्तानी गोलंदाज!

सलमान खानच्या संघात पाकिस्तानी गोलंदाज!

Subscribe

बॉलिवूड स्टार हे क्रिकेट संघ खरेदी करण्यातही पुढे असतात.

क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यात एक वेगळे नाते आहे. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही बहुधा भारतातील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. इतकेच काय, तर बॉलिवूड स्टार हे क्रिकेट संघ खरेदी करण्यातही पुढे असतात. शाहरुख खान आणि प्रिती झिंटा हे जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा असणाऱ्या आयपीएलमधील संघांचे मालक आहेत. शाहरुख हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा, तर प्रिती झिंटा ही किंग्स इलेव्हन पंजाब संघाची सह-संघमालक आहे. आता या यादीत सलमान खानचाही समावेश झाला आहे. सलमानने श्रीलंकेतील टी-२० स्पर्धा ‘लंका प्रीमियर लीग’मधील संघ खरेदी केला आहे.

कँडी टस्कर्स संघ केला खरेदी

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि वडील सलीम खान यांच्या मालकीच्या ‘सोहेल खान इंटरनॅशनल’ कंपनीने लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील कँडी टस्कर्स हा संघ खरेदी केला आहे. या संघात वेस्ट इंडिजचा विस्फोटक सलामीवीर क्रिस गेलचा समावेश आहे. तसेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझही या संघाचा भाग आहे. तसेच या संघात लियम प्लंकेट, कुसल परेरा, कुसल मेंडिस, नुवान प्रदीप या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे.

- Advertisement -

श्रीलंकन चाहत्यांचे क्रिकेटवर प्रेम

‘लंका प्रीमियर लीगमध्ये मोठी स्पर्धा होण्याची क्षमता आहे आणि या स्पर्धेचा भाग झाल्याचा मला आनंद आहे. श्रीलंकन चाहत्यांचे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. हे चाहते संघाला पाठिंबा देतील याची मला खात्री आहे. क्रिस गेल हा युनिव्हर्स बॉस आहे. मात्र, त्याच्या व्यतिरिक्तही आमच्या संघात चांगले खेळाडू आहेत. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. त्यामुळे आमचा संघ अंतिम सामन्यात खेळताना दिसू शकेल,’ असे सोहेल खान म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -