घरक्रीडामाजी हॉकी कर्णधार संदीप सिंग होणार अजरामर

माजी हॉकी कर्णधार संदीप सिंग होणार अजरामर

Subscribe

जयपूरच्या वॅक्स संग्रहालयात उभारला जाणार पुतळा

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंगचा पुतळा पुढील महिन्यात नहरगढ किल्ला येथील जयपूर वॅक्स संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. ‘फ्लिकर सिंग’ म्हणून ओळखला जाणारा संदीप सिंग याने आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वानांच वेड लावले. भारतीय हॉकी संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे त्याला हा मान मिळत आहे. संदीपने भारतीय हॉकी संघात २००४ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले असून २००९ ते २०१० दरम्यान संदीप भारतीय संघाचा कप्तान देखील होता. २०१० साली संदीपला अर्जुन अवार्डने सन्मानीत केले गेले होते.
महाराणा प्रताप, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, मदर तेरेसा, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि जयपूरचे पूर्वीचे काही शासक यांचे मेणाचे आणि सिलिकॉनचे पुतळे या संग्रहालयात आहेत. यांच्या सोबतच आता संदीपचा पुतळा उभारला जाणार आहे. यावेळी एका वृत्तसंस्थेला संदीपने सांगितले की “संग्रहालयाकडून दोन महिन्यांपूर्वी माझा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आला आणि मी लगेचच हो म्हणालो, माझ्या पुतळ्याचे पुढील महिन्यात अनावरण होणार असून १३ जुलै रोजी हा समारंभ होणार आहे.”
तसेच संग्रहालयाचे संस्थापक अनूप श्रीवास्तव म्हणाले की “३२ वर्षीय संदीप सिंग हा एक सुप्रसिद्ध हॉकीपट्टू असून, त्याने भारतीय हॉकीला अनेक मान मिळवून दिले आहेत. तसेच त्याचा प्रवास थरारक आणि प्रेरणादायी आहे आणि पुढच्या पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि जीवन कसे जगावे ते शिकून घ्यावे, यासाठी आम्ही संग्रहालयात त्याचा मेणाचा पुतळा बसवणार आहोत.” या संग्रहालयातील हा ३६वा पुतळा असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -