सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहेत. सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या केमिस्ट्रीने एके काळी प्रत्येकाला आश्चर्यचकित करुन टाकले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांच्या नात्यामध्ये काहीही ठिक नसल्याचं समोर येत होतं. दरम्यान आता या दोघांच्या घटस्फोटवर शिक्का मोर्तब झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोएब मलिकने पत्नी सानिया मिर्झाची फसवणूक केली आहे आणि सध्या दोघेही वेग-वेगळ्या घरामध्ये राहत आहेत.

12 वर्षाच्या सुखी वैवाहिक आयुष्यानंतर घटस्फोटचा निर्णय


भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि यांचे लग्न 12 एप्रिल 2010 झाली हैदराबादमध्ये झाले होते. त्यांना इजहान नावाचा एक मुलगा आहे. त्याचा जन्म 2018 मध्ये झाला होता. सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या केमिस्ट्रीने एके काळी प्रत्येकाला आश्चर्यचकित करुन टाकले होते. याचं संदर्भात सानियाने एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामधून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सानियाने स्टोरीमध्ये लिहिलंय की, ‘तुटलेली मनं कुठे जातात? अल्लाहला शोधण्यासाठी’. सानियाच्या या पोस्टने सोशल मीडियावर चर्चांणा उधाण आले आहे.

दोघांच्या घटस्फोटामागे काय आहे नेमकं कारण?
पाकिस्तानातील काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब मलिकचे विवाहबाह्य संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी शोएबने पाकिस्तामी मॉडेल आणि अभिनेत्री आयशा उमरसोबत एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यामुळे अनेकांच्या मते या दोघांच्या घटस्फोटामागे आयशा उमरचं नाव जोडलं जात आहे.

 


हेही वाचा :

सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांचा होणार घटस्फोट? सानियाच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण