सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांचा होणार घटस्फोट? सानियाच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्जा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहेत. सानिया आणि शोएब यांच्या केमिस्ट्रीने एके काळी प्रत्येकाला आश्चर्यचकित करुन टाकले होते. मात्र, आता सोशल मीडियावर दोघांच्या नात्यामध्ये काहीही ठिक नसल्याचं समोर येत आहे. दोघांचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. याचं दरम्यान, सानिया मिर्जाने नेटकऱ्यांच्या संशयाला खतपाणी घातलं आहे.

सानिया आणि शोएब मलिकचा होणार घटस्फोट?

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

सानिया मिर्जामने नुकत्याच केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिचा मुलगा इजहानचा एक सुंदर फोटो शेअर करत खाली कॅप्शन लिहिलं होतं. त्यामध्ये तिने लिहिलंय की, “ते क्षण जे मला सगळ्या कठीण काळात घेऊन जातात.” इतकचं नव्हे तर तिच्या इतर पोस्टमध्ये देखील असे काही कॅप्शन देण्यात आले आहेत. सानियाने आधीच्या एका पोस्टमध्ये, ‘तुटलेलं मन कुठे जाते?’ असं देखील लिहिलं होतं. तिच्या अश्या प्रकारच्या कॅप्शन्स वरुन सानिया दुःखी असल्याचं म्हटलं जात आहे.

तर दुसरीकडे सानियाचा पती शोएब मलिकने नुकताच त्याचा मुलगा इजहानच्या वाढदिवसाचते फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये सानिया देखील दिसत आहे. मात्र, तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मुलाच्या वाढदिवसाचा एकही फोटो शेअर केला नाही. सानिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मात्र तिच्या या पोस्ट्स मुळे सानिया आणि शोएब मलिकमध्ये काहीतरी बिनसलं असावं असं म्हटलं जात आहे.

 


हेही वाचा :

नीतू कपूरने दिली आलिया आणि नातीच्या प्रकृतीबद्दल माहिती