घरक्रीडाSania Mirza Retirement : टेनिसपटू सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा,म्हणाली...

Sania Mirza Retirement : टेनिसपटू सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा,म्हणाली…

Subscribe

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. 2022 चा हंगाम तिच्यासाठी शेवटचा असून ही माहीती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभूत झाल्यानंतर सानिया मिर्झाने दिली. सानिया आणि तिची युक्रेनची जोडीदार नादिया किचनोक यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2022 चा हंगाम तिच्यासाठी शेवटचा असून, ही माहीती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभूत झाल्यानंतर सानिया मिर्झाने दिली. सानिया आणि तिची युक्रेनची जोडीदार नादिया किचनोक यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा स्लोव्हेनियाच्या तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांनी एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७(५) असा पराभव केला. मात्र, सानिया आता या ग्रँडस्लॅमच्या मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसह सहभागी होणार आहे. 2003 पासून आंतरराष्ट्रीय टेनिस सामने खेळणारी सानिया मिर्झा आता टेनिसकोर्ट सोडणार आहे. ३५ वर्षीय सानिया ही भारतातील सर्वात मोठी महिला टेनिस स्टार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

- Advertisement -

सानिया मिर्झाला बुधवारीच ऑस्ट्रेलियन ओपनच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सानिया मिर्झाने सांगितले की, हा तिचा शेवटचा सीझन असेल, ती पुढच्या आठवड्याची तयारी करत आहे. पण ती पूर्ण सीझन खेळू शकेल की नाही याची खात्री नाही.सामन्यानंतर सानिया मिर्झाने सांगितले की, मला खेळण्याची इच्छा खूप आहे, परंतु आता शरीर साथ देऊ शकत नाही.

सानियाला पाठीच्या दुखण्यामुळे खेळातून माघार घ्यावी लागली. आतापर्यंत WTA चे विजेतेपद पटकावणाऱ्या दोनच भारतीय महिला टेनिसपटू आहेत. सानिया ही त्यापैकीच एक आहे. सानियाने 2010 मध्ये पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर आणि माजी कर्णधार शोएब मलिकसोबत लग्न केले.

- Advertisement -

सानियाने आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम जिंकले 

सानिया मिर्झाने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन महिला दुहेरीत जिंकली आहे. त्याचबरोबर मिश्र दुहेरीत तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन जिंकले आहे.

 

सानिया मिर्झाने हा पुरस्कार जिंकून रचला इतिहास

गेली 19 वर्षे ती अविरत टेनिस खेळत असून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने भारताला विजय मिळवून दिला आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा आई बनल्यानंतर टेनिस कोर्टवर यशस्वी पुनरागमनासाठी फेड कप हार्ट पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय ठरली. या विजयाचे पैसे तेलंगणा सीएम रिलीफ फंडामध्ये देण्याचा निर्णय तिने घेतला. सानियाला आशिया ओशनिया प्रदेशासाठी पुरस्कार देण्यात आला.


हेही वाचा – BBL 11: बीग बॅश लीगमध्ये पहिल्याच सामन्यात उन्मुक्त चंद फ्लॉप, BBL खेळणारा पहिला भारतीय खेळाडू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -