Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Tokyo Olympic च्या तयारीत सानिया मिर्झा व्यस्त, वर्कआउटचा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!

Tokyo Olympic च्या तयारीत सानिया मिर्झा व्यस्त, वर्कआउटचा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!

व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून होतंय कौतुक

Related Story

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिक २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते, परंतु कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशभर असताना या साथीच्या आजारामुळे एका वर्षासाठी ऑलिम्पिक रद्द करून पुढे ढकलले गेले होते. सानिया मिर्झा गेल्या काही महिन्यांपासून टोकियो ऑलिम्पिकची तयारी करत आहे. तिने आपल्या व्यायामाचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. यामध्ये तिची सुरू असलेली तयारी आणि मेहनतीचा अंदाज येतो, ती बरेच तास जिममध्ये घाम गाळून टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी करतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सानिया एका ट्रेनरसोबत खूप मेहनत घेत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही तिचा उत्साह वाढवत आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्यावर कमेंटही केले आणि तिचे अभिनंदन केले आणि सांगितले की ती नक्कीच यशस्वी होईल. तर कोणी तिच्या मेहनतीला सलाम करत आहे.

यंदा सानिया मिर्झाने फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला नाही. सहा वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन सानियाला जूनपासून डब्ल्यूटीए २५० च्या नॉटिंगहॅम ओपनमध्ये ग्रास कोर्ट हंगाम सुरू करणार होती. मात्र तिला व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे तिला या स्पर्धेत भाग घेता आला नसल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, सानिया इंग्लंडला पोहोचल्यानंतर तिला १० दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यामुळे सानिया १४ जूनपासून बर्मिंघॅम ओपनमध्ये भाग घेणार आहे. त्यानंतर २० जूनपासून ईस्टबॉर्न ओपन आणि २८ जूनपासून विम्बल्डनमध्ये ती भाग घेणार आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत सानियाला या स्पर्धांचा फायदा नक्कीच होणार आहे.


Nasal Vaccine : नेजल वॅक्सिन इतर वॅक्सिनपेक्षा का आहे वेगळी? जाणून घेऊ

- Advertisement -