दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात ‘हे’ दोन बदल महत्वाचे : संजय बांगर

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघ (Indian Cricket Team) तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघ (Indian Cricket Team) तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, भारताचे माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनीही भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यासाठी संघात दोन बदल केले पाहिजेत असे मत व्यक्त केले आहे. (sanjay bangar names replacement of axar patel and avesh khan)

संजय बांगर यांच्या मते फिरकीपटू अक्षर पटेलऐवजी (Axar Patel) रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) चांगला पर्याय ठरू शकतो. कारण अक्षर पटेलने आतापर्यंतच्या या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली नाही. दोन सामन्यांमध्ये केवळ एक विकेट घेत धावाही अधिक दिल्या, असे त्यांनी म्हटले.

याशिवाय, वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) यालाही या मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आवेशऐवजी अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) संधी मिळण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा – भुवनेश्वरची चमकदार खेळी, गोलंदाजीच्या जोरावर एकाच सामन्यात रचले मोठे विक्रम

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातीव ५ टी-२० सामन्यांच्या या माविकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. या मालिकेमध्ये ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भारतीय संघ :

ऋषभ पंत (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक


हेही वाचा – वनडे संघ क्रमवारीत पाकिस्तान भारताच्या एक पाऊल पुढे