घरक्रीडासारा, मान्वी, गार्गी विजेते

सारा, मान्वी, गार्गी विजेते

Subscribe

इन्स्टिट्यूट फॉरचेस एक्सलन्सतर्फे मुंबई शहर बुध्दिबळ संघटना आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त झालेल्या विविध वयोगट जलद बुध्दिबळ स्पर्धेत सारा नाईक, मान्वी चौधरी, गार्गी तळवेलकर यांनी गटविजेतेपद पटकाविले. ८ वर्षांखालील मुलींच्या गटात अपराजित सारा नाईकने निर्णायक फेरीत भाविका भंडारीला शह देऊन साखळी चौथ्या गुणासह विजेतेपद पटकाविले.

समान साखळी ३ गुण घेऊनही सरस सरासरीच्या बळावर भाविका भंडारीने द्वितीय, अन्वी मोहपात्राने तृतीय तर आश्रिता गुटूलाने चौथा क्रमांक मिळविला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. १० वर्षाखालील मुलींमध्ये मान्वी चौधरी व हिमांशी तेंडुलकर यांचे समान साखळी ३.५ गुण झाल्यामुळे उत्तम सरासरीचा लाभ उठवत मान्वी चौधरीने प्रथम क्रमांक पटकाविला.

- Advertisement -

हिमांशी तेंडूलकरने द्वितीय तर ३ गुणांसह नक्षत्रा शिर्सेकरने तृतीय क्रमांक मिळविला. १२ वर्षाखालील मुलींमध्ये अपराजित गार्गी तळवेलकरने सर्वाधिक साखळी ४ गुण नोंदवून विजेतेपदाला गवसणी घातली. गौरी सारस्वतने (३ गुण) द्वितीय तर यशश्री सुर्वेने (३ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. शारदाश्रम विद्या मंदिर-दादर येथे मुंबई ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सबज्युनियर बुध्दिबळपटूंनी विविध वयोगटात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -