IPL 2022: ‘अपना टाईम आएगा…’, भाऊ अर्जुनसाठी सारा तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या साखळी फेरीतच बाहेर गेल्यामुळे त्याचे आयपीएल पदार्पण पुन्हा एकदा लांबले आहे. परंतु, त्यानंतर आता अर्जुनची बहिण सारा तेंडुलकर हिने एक भावनिक पोस्ट करत त्याला पाठिंबा दिला आहे.

आयपीएलमधील (IPL) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulker) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulker) याला यंदाही संघात खेळण्याची संधी दिली नाही. गतवर्षी मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतले होते. त्यामुळे यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या पर्वात त्याला पदार्पणाची संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या साखळी फेरीतच बाहेर गेल्यामुळे त्याचे आयपीएल पदार्पण पुन्हा एकदा लांबले आहे. परंतु, त्यानंतर आता अर्जुनची बहिण सारा तेंडुलकर हिने एक भावनिक पोस्ट करत त्याला पाठिंबा दिला आहे.

अर्जुनचा एक छोटासा व्हिडीओ पोस्ट

सारा तेंडुलकरने यंदा सामन्यासाठी उपस्थित असताना अर्जुनचा एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो मैदानाबाहेर बॉलबॉय म्हणून काम करत होता. त्या व्हिडीओमागे ‘अपना टाईम आएगा’, असे गाणे लावून तिने भावाला भावनिक पाठिंबा दिला. साराची आपल्या भावासाठी केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकांनी साराच्या पोस्टचे कौतुक केले आहे. तसेच, बऱ्याच चाहत्यांनी अर्जुनला मुंबई संघातून संधी द्यायला हवी होती असा सूर लावला. तर काहींनी अर्जुनला संधी न दिल्याबद्दल रोहित शर्मावरही टीका केली.

हेही वाचा – IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला IPLमध्ये पदार्पण करण्याची संधी, मुंबई इंडियन्सकडून फोटो शेअर

३० लाखांची बोली

आयपीएलच्या मेगालिलावात अर्जुनला मुंबईच्या संघाने ३० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले होते. IPL 2021 मध्येही मुंबई इंडियन्सने अर्जुनला विकत घेतले होते, पण त्यावेळीही त्याला एकाही सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. यंदा त्याचे IPL पदार्पण होण्याची शक्यता सर्वाधिक होती. परंतु, त्याचे आयपीएल पदार्पण लांबले आहे.

चार संघांमध्ये महत्वाची लढत

दरम्यान, इंडियन प्रिमीयर लीग (Indian Primier League) स्पर्धेचे सर्व लीग सामने संपले असून आता प्ले ऑफमध्ये (IPL 2022 Playoffs) दाखल झालेल्या चार संघांमध्ये महत्वाची लढत होणार आहे. या चार संघांपैकी पहिल्या दोन संघांत क्लालिफायर (Qualifire 1) आणि दुसऱ्या दोन संघांत एलिमिनेटरचा (eliminator) सामना होणार आहे.


हेही वाचा – IPL 2022: पाऊस पडल्यास फायनलमध्ये ‘हे’ संघ खेळणार, जाणून घ्या बीसीसीआयचा नवा नियम