घरक्रीडाThailand Open : सात्विक-चिराग पराभूत; भारताचे आव्हान संपुष्टात 

Thailand Open : सात्विक-चिराग पराभूत; भारताचे आव्हान संपुष्टात 

Subscribe

सात्विक-चिरागचा मलेशियाच्या चिआ आणि यिक या जोडीने पराभव केला.

भारताचे थायलंड ओपन स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारताच्या जोडीला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सात्विक-अश्विनीवर देशापोल पुआव्हरानुक्रो आणि सॅपसिरी टॅराटॅनाशाय या अव्वल सीडेड जोडीने २०-२२, २१-१८, १२-२१ अशी मात केली. त्याआधी सात्विकला चिराग शेट्टीसोबत खेळताना पुरुष दुहेरीतही पराभवाचा सामना करावा लागला. ‘आम्ही उपांत्य फेरी गाठू शकलो याचा आनंद आहे. मात्र, आम्हाला या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही. आम्हाला आमच्या सर्व्हिसवर गुण मिळवता आले नाहीत. पहिल्या गेममध्ये आम्ही आमच्या सर्व्हिसवर अधिक गुण मिळवले असते, तर हा सामना जिंकू शकलो असतो,’ असे सामन्यानंतर चिराग शेट्टी म्हणाला.

पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्विक-चिरागचा मलेशियाच्या अ‍ॅरॉन चिआ आणि सोह वूई यिक या जोडीने पराभव केला. चिआ आणि यिक या जोडीने हा सामना २१-१८, २१-१८ असा जिंकला. या सामन्याच्या सुरुवातीला सात्विक-चिरागकडे ४-२ अशी आघाडी होती. मात्र, मलेशियाच्या जोडीने पहिल्या गेमच्या मध्यंतराला ११-१० अशी आघाडी घेतली.

- Advertisement -

सात्विक-चिरागने चांगले पुनरागमन करत त्यांची आघाडी १५-१६ अशी कमी केली. यानंतर मात्र चिआ आणि यिक या जोडीने अधिक आक्रमक खेळ करत पहिला गेम २१-१८ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मलेशियाच्या जोडीने चांगला खेळ सुरु ठेवला. त्यांनी हा गेमही २१-१८ असा जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.


हेही वाचा – पंतला ‘या’ फलंदाजाच्या जागी संधी मिळाली पाहिजे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -