घरक्रीडाफॉर्म्युला वनमध्ये सौदी अरेबियाची महिला

फॉर्म्युला वनमध्ये सौदी अरेबियाची महिला

Subscribe

सौदी अरेबियात १९९०च्या दशकात काही महिलांना गाडी चालवल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. सौदी अरेबियातील रियादमध्ये महिलांवर ही कारवाई करण्यात आली होती

सौदी अरबियातील महिलांवर कार चालवण्यावर घातलेली बंदी काही दिवसांपूर्वीच सरकारने हटवली. सौदी सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयानंतर फॉर्म्युला वन या स्पर्धेत सौदीची पहिली महिला कार चालवताना पहायला मिळणार आहे. असील अल हमद असे या महिलेचे नाव असून तिने ही संधी फ्रान्समध्ये मिळवली आहे. असीलने यापूर्वी ‘ले कास्टेलेट सर्किट’ ही कार चालवली आहे. फॉर्म्युला वनच्या रैनो टीमकडून असीलला ही संधी मिळाली असून ती रैनो टीमच्या पॅशन परेडचा हिस्सादेखील आहे. विशेष म्हणजे असील तीच गाडी चालवणार आहे, ज्या गाडीने प्रसिद्ध फॉर्म्युला वन स्टार किमी राइकोनेने २०१२ मध्ये अबू दाबीत रेस जिंकली होती.

aseel hamad
असील अल हमद

सौदी अरेबियातील सरकारने महिलांच्या कार चालवण्यावरील बंदी हटवल्यानंतरच महिलांची ड्रायव्हींग लायसन्ससाठी अर्ज देण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत १ लाख २० हजार अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल २८ वर्षांच्या संघर्षांनंतर सौदी सरकारकडून आलेल्या या निर्णयाचे महिलांनी जंगी स्वागत केले. सर्व महिला शनिवारी रात्री १२ वाजता आनंद साजरा करत थेट रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी आल्या. सौदी सरकारकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार २०२० पर्यंत तब्बल ३० लाख महिलांना परवाने देण्यात येणार आहेत.

- Advertisement -
saudi women
सौदी अरबियातील महिलांत आनंदाचे वातावरण

सौदी अरेबियात १९९०च्या दशकात काही महिलांना गाडी चालवल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. सौदी अरेबियातील रियादमध्ये महिलांवर ही कारवाई करण्यात आली होती. २०११ ते २०१४ च्या दरम्यान सौदीतील काही महिलांनी सौदी शासनाच्या नियमांच्याविरोधात जाऊन गुपचूप कार चालवली होती आणि त्याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -