भारत-वेस्ट इंडिज दुसरा एकदिवसीय सामना इंदूरऐवजी विशाखापट्टणममध्ये

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २४ ऑक्टोबर रोजी इंदूरच्या होळकर स्टेडिअममध्ये होणार होता. पण आता हा सामना व्हिडीसीए क्रिकेट स्टेडीयम,विशाखापट्टणम येथे होणार आहे.

सौ - Wikipedia
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २४ ऑक्टोबर रोजी इंदूरच्या होळकर स्टेडिअममध्ये होणार होता. पण आता हा सामना व्हिडीसीए क्रिकेट स्टेडीयम,विशाखापट्टणम येथे होणार आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन-बीसीसीआय यांच्यात वाद

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील वादामुळे हा सामना आता इंदूर येथे होणार नाही. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्यात कॉम्प्लिमेंटरी (मानार्थ) तिकिटांवरून वाद झाला. बीसीसीआयच्या नवीन संविधानानुसार एकूण तिकिटांपैकी ९० टक्के तिकिटे ही लोकांसाठी उपलब्ध करायची असतात. होळकर स्टेडिअमची क्षमता ही २७,००० लोकांची आहे. त्यामुळे फक्त २७०० तिकिटे ही मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनसाठी उरतात. त्यातच बीसीसीआय आपल्या प्रयोजकांसाठीही वेगळी तिकिटे मागतात. या सर्व मागण्यांवरून मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्यात वाद झाला. त्यामुळे बीसीसीआयने या सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

वनडे मालिका-

पहिला वनडे सामना- २१ ऑक्टोबर (बारसपारा स्टेडियम,गुवाहटी)

दुसरा वनडे सामना- २४ ऑक्टोबर (व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम)

तिसरा वनडे सामना- २७ ऑक्टोबर (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे)

चौथा वनडे सामना- २९ ऑक्टोबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)

पाचवा वनडे सामना- १ नोव्हेंबर (ग्रिनफिल्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम)