घरक्रीडामयांक अगरवालमध्ये सेहवागची छटा!

मयांक अगरवालमध्ये सेहवागची छटा!

Subscribe

भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २१५ धावांची खेळी केली. मयांक हा कसोटी क्रिकेटमधील पहिल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा भारताचा चौथा फलंदाज आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना सलग दोन सामन्यांत अर्धशतके झळकावली होती. त्याने आतापर्यंत ५ कसोटी सामन्यांच्या ९ डावांमध्ये ४९७ धावा केल्या आहेत. मयांकच्या या कामगिरीने भारताचा महान फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मण प्रभावित झाला आहे. मयांकमध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागची छटा दिसते, असे तो म्हणाला.

मयांक हा खूपच चांगला फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना, हा एखादा स्थानिक क्रिकेटमधील सामना असल्याप्रमाणे तो खेळला. त्याने फारसे दडपण घेतले नाही. खेळाडू सहसा स्थानिक क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे खेळतात, त्याप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाहीत. ते आपल्या खेळात बदल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मयांकने तसे केले नाही. मानसिकदृष्टया तो खूप सक्षम आहे आणि ही त्याची जमेची बाजू आहे. तो त्याचा आदर्श असलेल्या विरेंद्र सेहवागप्रमाणे बिंदास खेळतो, असे लक्ष्मण म्हणाला.

- Advertisement -

स्थानिक क्रिकेटमध्ये बरीच वर्षे खेळल्याचा मयांकला फायदा झाला आहे, असे भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगला वाटते. मयांक पायांचा चांगला वापर करतो. तो मोठे फटके मारण्यात सक्षम आहे आणि रिव्हर्स-स्विपही उत्तम मारतो. तो मैदानाच्या सर्व कोपर्‍यांमध्ये फटके मारू शकतो. मयांक खूप मेहनती आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये बरीच वर्षे खेळल्याचा त्याला आता फायदा होत आहे. जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी बरीच वर्षे स्थानिक क्रिकेट खेळलेला असतो, तेव्हा त्याच्याकडे अनुभव असतो आणि त्याला खेळाची चांगली समज असते, असे हरभजनने सांगितले.

मयांक, रोहितला क्रमवारीत बढती

- Advertisement -

भारताच्या रोहित शर्माने कसोटीत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके केली. याचा त्याला आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याने कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम १७ व्या स्थानी झेप घेतली आहे. १७६ आणि १२७ धावांची खेळी करणार्‍या रोहितला तब्बल ३६ स्थानांची बढती मिळाली. त्याचा सलामीचा साथी मयांक अगरवालने द्विशतक केले. त्यामुळे त्याला ३८ स्थानांची बढती मिळाली असून तो थेट २५ व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने अव्वल १० मध्ये प्रवेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -