घरक्रीडाविंडीजविरुद्ध मिळणार्‍या संधीचे सोने करा!

विंडीजविरुद्ध मिळणार्‍या संधीचे सोने करा!

Subscribe

सलामीवीर मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळणार्‍या संधीचा फायदा घेत दमदार कामगिरी केली पाहिजे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीला वाटते. भारताने विंडीजविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी केवळ दोनच सलामीवीरांची निवड केली आहे. मयांकने मागील वर्षाच्या शेवटाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

त्या मालिकेतील २ सामन्यांत त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने १९५ धावा केल्या. त्यामुळे त्याने कसोटी संघात आपले स्थान पक्के केले. राहुलला मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. मात्र, युवा पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत त्याला पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची विंडीजविरुद्ध संधी मिळणार आहे.

- Advertisement -

आम्ही या मालिकेसाठी दोनच मुख्य सलामीवीरांची निवड केली आहे. या मालिकेच्या चारही डावांत त्यांना संधी देण्याचा आणि त्यांना नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा आमचा विचार आहे. मयांकने पदार्पण केल्यापासूनच चांगले प्रदर्शन केले आहे. तसेच राहुलनेही याआधी उत्तम कामगिरी केली आहे. त्याचे या मालिकेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे, असे कोहलीने सांगितले.

तो पुढे म्हणाला, प्रत्येक खेळाडूला दमदार कामगिरी करायची असते, पण तुम्ही संघाच्या कामगिरीत किती योगदान देता हे जास्त महत्त्वाचे असते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या कसोटीत (हनुमा) विहारीने सलामीवीर म्हणून खेळताना केवळ १८ आणि २० धावाच केल्या होत्या. मात्र, त्याने ८५ चेंडू खेळून काढले. यावरून लक्षात येथे की तो स्वतःसाठी नाही, तर संघासाठी खेळला. त्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये संयम दाखवल्यामुळे मला आणि पुजाराला नंतर धावा करणे सोपे झाले. पुजाराने त्या सामन्यात शतक केले. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध या मालिकेत मिळणार्‍या संधीचा सलामीवीरांनी पुरेपूर उपयोग केला पाहिजे.

- Advertisement -

सिनियर फलंदाजांनी जबाबदारीने खेळले पाहिजे

भारतीय कसोटी संघात विराट कोहलीबरोबरच चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अजिंक्य रहाणे असे उत्कृष्ट फलंदाज आहे. या सर्व फलंदाजांच्या गाठीशी बराच अनुभव असल्याने त्यांनी जबाबदारीने खेळले पाहिजे, असे मत कर्णधार कोहलीने व्यक्त केले. सिनियर खेळाडूंनी जास्तीतजास्त धावा केल्या पाहिजेत. आम्ही सर्वांनीच अधिक जबाबदारीने खेळले पाहिजे. आम्ही आता बरीच वर्षे कसोटी क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना सर्वोत्तम खेळ करत इतर खेळाडूंवरील दबाव कमी करायचा आहे, असे कोहली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -