घरक्रीडासेरेनाची विम्बल्डनच्या फायनलमध्ये एन्ट्री

सेरेनाची विम्बल्डनच्या फायनलमध्ये एन्ट्री

Subscribe

सेरेनासोबतच जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने लॅटवियाच्या जेलेना ओस्टपेनकोला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे

लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन २०१८ स्पर्धेत आतापर्यंत बरेच धक्कादायक रिझल्टस आपल्या समोर आले आहेत. सर्वात आधी मारिया शारापोवाच्या स्पर्धेबाहेर गेली तर त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतून विश्वविजेता रॉजर फेडरर बाहेर गेला. या दोन दिग्गजांच्या स्पर्धेबाहेर जाण्याने टेनिस जगतात खळबळ माजली. त्यामुळे यानंतर आता स्पर्धेत राहिलेल्या मोठ्या खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ज्यात राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, नोव्हाक जोकोव्हिचसारखे खेळाडू आहेत. ज्यातील महिला टेनिसमधील सर्वोत्तम खेळाडू समजली जाणारी सेरेना विल्यम्स विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. तिने जर्मनीच्या जुलिया ग्योर्जेसचा २-६, ४-६ असा पराभव केला. यामुळे तिने विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात तब्बल नव्यांदा प्रवेश केला आहे. याआधी सेरेनाने ७ वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेरेनाने आपले वर्चस्व प्रस्तापित करताना दिसून आली. पहिल्या सेटमध्ये तिने जुलियाची सर्विस ४ वेळा मोडली आणि हा सेट २-६ असा जिंकला. दुसऱ्या सेटपासून जुलिया आपला खेळ उंचावेल अशी अपेक्षा होती. मात्र, तिला तसे करण्याची सेरेनाने संधीच दिली नाही. तिने दुसरा सेट ४-६ असा जिंकत सामन्यात दमदार विजय मिळवला.

- Advertisement -


तर दुसरीकडे सुरू असलेल्या जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने लॅटवियाच्या जेलेना ओस्टपेनकोला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. कर्बरने जेलेनाचा ३-६, ३-६ असा पराभव करत दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली. कर्बरने याआधी विम्बल्डन जिंकलेली नाही. त्यामुळे सेरेना आणि कर्बर यांच्या अंतिम सामन्यात सेरेना जिंकेल असा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -