घरक्रीडाUS OPEN 2018 : अंतिम सामन्यात सेरेना-ओसाका आमनेसामने

US OPEN 2018 : अंतिम सामन्यात सेरेना-ओसाका आमनेसामने

Subscribe

अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिचा अंतिम फेरीत जपानच्या नाओमी ओसाकाशी होणार आहे.

वर्षाचा शेवटचा ग्रँड स्लॅम अमेरिकन ओपनमध्ये ही स्पर्धा ६ वेळा जिंकणाऱ्या सेरेना विलियम्सने अनास्तासिया सेवास्तोव्हा हिचा ६-०, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही तिची नववी वेळ आहे.

विलियम्सने मिळवला सहज विजय

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेरेना १९ व्या सीडेड अनास्तासिया सेवास्तोव्हावर अगदी सहज विजय मिळवला. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये सेरेनाने सेवास्तोव्हाला एकही गेम जिंकू दिला नाही. तिने सुरूवातीपासूनच या सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थपित केले. त्यामुळे तिने हा सेट ६-० असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये सेवास्तोव्हाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण सेरेनाने तसे तिला करू दिले नाही आणि तिने हा सेट ६-३ असा जिंकत सामनाही जिंकला.

 

- Advertisement -

जपानच्या ओसाकाचा विक्रमी विजय 

जपानच्या नाओमी ओसाकानेही अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण तिचा उपांत्य फेरीतील हा विजय साधासुधा नव्हता. याचे कारण म्हणजे अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी ओसाका ही पहिला जपानी महिला टेनिसपटू ठरली आहे. तिने अमेरिकेच्या मॅडिसन किज हिचा ६-२, ६-४ असा पराभव केला. त्यामुळे तिने पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -