घरक्रीडायुएफा युरोपा लीग : मँचेस्टर युनायटेडवर मात करत सेव्हिया अंतिम फेरीत

युएफा युरोपा लीग : मँचेस्टर युनायटेडवर मात करत सेव्हिया अंतिम फेरीत

Subscribe

मँचेस्टर युनायटेडला यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते.

इंग्लंडमधील बलाढ्य संघ मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का देत स्पॅनिश संघ सेव्हियाने युएफा युरोपा लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सहा वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या सेव्हियाने उपांत्य फेरीचा सामना २-१ असा जिंकला. मँचेस्टर युनायटेडला यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांना गोल करण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्याही, पण आघाडीच्या फळीतील खेळाडूंना या संधीचा फायदा घेण्यात अपयश आले. त्यामुळे मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

सेव्हिया २० सामने अपराजित 

उपांत्य फेरीतील सामन्याची युनायटेडने आक्रमक सुरुवात केली होती. नवव्या मिनिटाला त्यांना पेनल्टी मिळाली, ज्याचे ब्रुनो फर्नांडेसने गोलमध्ये रूपांतर करत युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांची ही आघाडी फार काळ टिकू शकली नाही. २६ व्या मिनिटाला सुसोने केलेल्या गोलमुळे सेव्हियाने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. उत्तरार्धातही सेव्हियाच्या खेळाडूंनी झुंजार खेळ सुरु ठेवला. याचा फायदा त्यांना ७८ व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा ल्युक डी याँगने गोल करत सेव्हियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत हा सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. सेव्हियाचा संघ आता सलग २० सामने अपराजित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -