IPL 2022 : सुहाना खान पहिल्यांदा IPL Auctionc मध्ये, तर शाहरुख ऐवजी आर्यन खानची हजेरी

आयपीएलच्या १५व्या हंगामातील मेगा लिलावाचे आयोजन यंदा बंगळुरुत करण्यात आले आहे. यावेळी प्री आयपीएल लिलाव ऑक्शन ब्रिफिंग करण्यात आले. ज्यात कोलकत्ता नाइट राइडर्सच्या वतीने आर्यन खान आणि सुहाना खान टीमचे प्रतिनिधीत्व करताना दिसले.

shah rukh khan missing in ipl auctions 2022 aryan suhana and suhana khan attend ipl auctions
IPL 2022 : सुहाना खान पहिल्यांदा IPL Auctionc मध्ये, तर शाहरुख ऐवजी आर्यन खानची हजेरी

IPL 2022 : आयपीएल २०२२ची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. बंगळुरूमध्ये आयपीएल मेगा लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. पंजाब किंग्ज टीमची मालकीण प्रिती झिंटा यावेळी लिलाव प्रकियेत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकलेली नाही तर दुसरीकडे कोलकत्ता नाइट राइडर्सकडूनही पहिल्यांदाच किंग खान शाहरुख खानही लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेला नाही. शाहरुख ऐवजी पहिल्यांदा त्याची मुलगी सुहाना खान लिलाव प्रक्रियेत दिसली. तर  मुलगा आर्यन खान लिलाव प्रक्रियेत पाहायला मिळाले. लिलाव प्रक्रियेतील आर्यन आणि सुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आयपीएलच्या १५व्या हंगामातील मेगा लिलावाचे आयोजन यंदा बंगळुरुत करण्यात आले आहे. यावेळी प्री आयपीएल लिलाव ऑक्शन ब्रिफिंग करण्यात आले. ज्यात कोलकत्ता नाइट राइडर्सच्या वतीने आर्यन खान आणि सुहाना खान टीमचे प्रतिनिधीत्व करताना दिसले. टीमचे सीईओ वेंकी यांच्यासोबत दोघे गहन चर्चा करताना दिसले.

आतापर्यंत पहिल्यांदा सुहाना खान आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाली होती. आर्यन खान मागील हंगामात दिसला होता. केकेआरची दुसरी मालकीण जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता देखील.  यंदाच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग झाली आहे. केकेआरच्या मुलांना एकत्र पाहून फार आनंद होत असल्याचे जुही चावलाने म्हटले आहे. जुही फोटो शेअर करत केकेआरचे अभिनंदन केले आहे.


हेही वाचा – IPL 2022 Mega Auction: Unsold ! सुरेश रैनासह ‘या’ दिग्गज खेळाडूंसाठी बोलीच…