घरक्रीडाआम्ही हिशेब चुकता करणार, भारत-पाक सामन्यांवर शाहिद आफ्रिदीचं मोठं वक्तव्य

आम्ही हिशेब चुकता करणार, भारत-पाक सामन्यांवर शाहिद आफ्रिदीचं मोठं वक्तव्य

Subscribe

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकबला होणार आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारतीय संघाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. दरम्यान, आजच्या सामन्यावर शाहिद आफ्रिदीने मोठं वक्तव्य केलं आहे.

पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानला 147 धावा करता आल्या होत्या. तसेच रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याने उल्लेखनिय कामगिरी केली होती. पाकिस्तानचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. फिरकीपटूंची आणि गोलंदाजांची कामगिरी तुम्ही पाहिली असता प्रत्येक गोष्टीत ते वरचढ आहेत. त्यामुळे सुपर 4 मध्ये आम्ही हिशेब चुकता करू, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.

- Advertisement -

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने संघात मोठा बदल केला आहे. शाहनवाज दहानीच्या जागी हसन अलीला संधी देण्यात आली आहे. तर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. दीपक हुड्डा संघात आला आहे तर रवी बिश्नोई देखील खेळणार आहे. तसेच हार्दिक पांड्या परतला आहे.

- Advertisement -

असा आहे भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग


हेही वाचा : भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा भिडणार, पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग 11 टीम?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -