घरक्रीडा'गेम चेंजर'मुळे आफ्रिदीचा गेम चेंज

‘गेम चेंजर’मुळे आफ्रिदीचा गेम चेंज

Subscribe

आफ्रिदीने आपल्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात खरी जन्म तारीख टाकून स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. दरम्यान, या पोलखोल नंतर आफ्रिदीला बीसीसीआयकडून मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे खरे वय जगासमोर आले आहे. त्यामुळे नेटीझन्सकडून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. आफ्रिदी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यामागील कारण देखील स्वत: आफ्रिदीच आहे. आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात खरी जन्म तारीख टाकून स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. दरम्यान, या पोलखोल नंतर आफ्रिदीला बीसीसीआयकडून मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खऱ्या आणि खोट्या जन्म तारखेत पाच वर्षांचा फरक

‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात आफ्रिदीने आपल्या खऱ्या जन्म तारखेचा उल्लेख केला आहे. या आत्मचरित्रात आफ्रिदीने म्हटले आहे की, ‘माझा जन्म १९८० सालचा नसून १९७५ चा आहे. श्रीलंकेविरोधात १९९६ मध्ये खेळताना मी ३७ चेंडूत शतक पटकावले होते. परंतु तेव्हा मी १६ नाही, तर १९ वर्षांचा होतो.’ संबंधित अधिकाऱ्याने आपली जन्म तारीख चुकीची लिहिल्याचा दावा आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. परंतु, त्याच्या या दाव्यातूनही त्याचे गणित कच्चे असल्याची माहिती समोर आली आहे. कारण १९७५ ते १९८० दरम्यान पाच वर्षांचा कालावधी येतो. त्याच्या सांगण्यानुसार त्याचे वय १९९६ मध्ये २१ असायला हेव. परंतु, तो आपले वय १९ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन नेटीजन्सनी त्याला चांगलेच झोडपले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -