घरक्रीडारोहित शर्माच्या ट्विटला शाहरूखचं मजेशीर उत्तर

रोहित शर्माच्या ट्विटला शाहरूखचं मजेशीर उत्तर

Subscribe

शाहरूख खान नेहमीच हजरजबाबीपणाने उत्तरं देत असतो. यावेळी क्रिकेटर रोहित शर्माच्या ट्विटवर असंच मजेशीर उत्तर शाहरूखने दिलं आहे.

बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानच्या ‘बाजीगर’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने शाहरूखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरूख खान ‘बाजीगर’मधील प्रसिद्ध संवाद म्हणाताना दिसत आहे. ‘कभी कभी कुछ जितने के लिए कुछ हारना पडता है और हारकर जितनेवाले को बाजीगर कहते हैं’ असा हा संवाद आजही तितकाच प्रसिद्ध आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शाहरूखच्या चाहत्यांनी आणि त्याच्या सर्व मित्रपरिवाराने त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. यामध्येच लक्ष वेधून घेणारी शुभेच्छा होती ती म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा धुरंधर रोहित शर्मा याची. यावर ट्विट करत रोहित म्हणाला, ‘बाजीगर माझा सर्वात आवडता चित्रपट आहे, यामध्ये काहीच शंका नाही.’

- Advertisement -

शाहरुखचं यावर मजेशीर उत्तर

रोहित शर्माने ट्विट केल्यानंतर शाहरूखनं जे उत्तर दिलं, ते फारच मजेशीर आहे. शाहरूखने या ट्विटला रिप्लाय देत म्हटलं, ‘पुढच्या वेळी तुझ्यासाठी आयपीएलमध्ये ‘काली काली आँखे’ या गाण्यावर नक्की आपण डान्स करू, मजेत राहा आणि खूप सारे प्रेम.’ यानंतर बऱ्याच नेटिझन्सने या उत्तराला लाईक केले आहे. शाहरूख नेहमीच आपल्या हजरजबाबीपणासाठीही ओळखला जातो. शिवाय शाहरूखची स्वतःचीदेखील आयपीएलमध्ये एक टीम आहे. त्यामुळे बऱ्याच क्रिकेटर्सना शाहरुख ओळखत असून त्याची त्यांच्याशी मैत्रीही आहे.

- Advertisement -

काय म्हटलं शाहरूखने?

शाहरुखने आपला व्हिडिओ शेअर करून म्हटलं होतं, ‘बाजीगर चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. माझ्या करिअरचे सर्वात मोठे यश या चित्रपटाचे आहे. तसेच या चित्रपटामुळे मला बरेच चांगले मित्रही मिळाले.’ याशिवाय शाहरूखने चित्रपटाच्या सर्व कलाकारांचे आभारही मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -