शाकीब हसन संतापला अन् रागाच्या भरात केलं असं काही…व्हिडीओ व्हायरल

बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकीब अल हसन नेहमी वादाच्या केंद्रस्थानी ठरला आहे. मैदानावरील आणि बाहेरील त्याची कृती अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा शाकीबने आपला राग एका चाहत्यावर व्यक्त केला आहे. त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका गर्दीत आपला संयम गमावून बसतो आणि कडक सुरक्षेत एका चाहत्याला मारहाण करतो. एम शमीम नावाच्या एका युजरने शाकीबचा हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका चाहत्याची टोपी काढून फेकतो आणि नंतर त्याच टोपीने त्या चाहत्याला मारहाण करतो.

शाकीबच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. यानंतर शाकीब म्हणाला की, ‘आम्ही ज्याप्रकारे कामगिरी केली, ती अप्रतिम होती. जेव्हा आम्ही गोलंदाजी करत होतो तेव्हा, सामना आमच्या आवाक्याबाहेर दिसत होता, पण कोणीही घाबरले नाही.


हेही वाचा : India vs Australia : शुभमन गिलने रचला इतिहास, भारताला अजून १९१ धावांची गरज