घरक्रीडाT20 World Cup: शाकीब-अल-हसनची शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी

T20 World Cup: शाकीब-अल-हसनची शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी

Subscribe

आयसीसी T20 वर्ल्ड कप २०२१ चा नववा सामना हा नुकताच बांग्लादेश आणि पापुआ न्यू गिनी यांच्या ओमान येथे अल आमेरत क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळला गेला. या सामन्यात बांग्लादेशच्या संघाने पापुआ न्यू गिनीला ८४ धावांनी मात देत सामना मोठ्या अंतराने जिंकला. या संपुर्ण सामन्या दरम्यान बांग्लादेशी स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसनने मैदान गाजवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ३७ चेंडूंमध्ये ४६ धावांची महत्वाची अशी कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करत विरोधी टीमच्या चार खेळाडूंना बाद करत, विजय खेचून आणला. या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही पातळीवर चमकदार कामगिरी शाकिबने केली. या कामगिरीच्या जोरावरच शाकिबचा टी २० मालिकेत नवा विक्रम झाला आहे. शाकिबने या सामन्यातील चार विकेट्समुळे पाकिस्तानच्या शाहिद अफरीदीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Shakid al hasan equals shahid afridi record in T20 world cup)

आयसीसी टी २० वर्ल्ड कपमध्ये झालेल्या नवव्या सामन्यात शाकिब अल हसनने चार्ल्स अमीनी, सेसे बाउ, साइमन अताई आणि हिरी हिरी यांना बाद केले. शाकिब अल हसनने चार्ल्सला १ धावांवर बाद केले. तर सायमन अताई शून्य धावांवर तर हिरी हिरीला ८ धावांवर तंबूत परत पाठवले. या सामन्यात शाकील अल हसनने वर्ल्ड कपमधील एका विक्रमाचीही बरोबरी केली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफरीदीच्या बरोबरीची अशी कामगिरी करत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा नवा विक्रम शाकीबच्या नावावर झाला आहे. शाकिबने या सामन्यात अतिशय जबाबदारीने खेळी करत चांगली फलंदाजीही केली. त्यामुळे एक चांगली धावसंख्या उभारण्यात बांग्लादेशच्या संघाला यश आले.

- Advertisement -

शाहीद अफरीदीने टी २० वर्ल्ड कपमध्ये २००७ पासून ते २०१६ च्या दरम्यान ३४ सामने खेळत ३४ इनिंगमध्ये २३.२५ च्या सरासरीने ३९ विकेट्स मिळवल्या. तसेच बांग्लादेशी ऑलराऊंडरच्या नावे आता टी २० वर्ल्ड कपमध्ये ३९ विकेट्सचा नवा विक्रम झाला. शाकिबने बांग्लादेश क्रिकेट टीमसोबत २८ टी २० वर्ल्ड कप सामने जिंकत २७ इनिंगमध्ये ही कामगिरी केली आहे. अल आमरेत क्रिकेट स्टेडियममध्ये चार विकेट्स घेत केलेल्या कामगिरीमुळे शाकिबने टी २० च्या एका नव्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या कामगिरीमुळे शाकिब अल हसन सर्वाधिक विकेट्स घेणारा असा खेळाडू ठरला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -