घरक्रीडाशमीमुळे माकल्म मार्शलची आठवण होते

शमीमुळे माकल्म मार्शलची आठवण होते

Subscribe

मोहम्मद शमीमुळे मला वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज माकल्म मार्शल यांची आठवण होते, असे विधान भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केले. मार्शल हे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जातात. शमीने मागील काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०१९ वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट मिळवणार्‍या गोलंदाजांच्या यादीत शमी अव्वल क्रमांकावर असून त्याने ४२ मोहरे टिपले आहेत. शमीच्या या कामगिरीमुळेच गावस्करांनी त्याचे कौतुक केले.

शमी हा माझा सर्वात आवडता भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याच्यामुळे मला महान माकल्म मार्शल यांची आठवण होते. गाड झोपेत असताना त्यांच्या विचाराने मला अजूनही जाग येते. तो जेव्हा गोलंदाजीसाठी धावत असतो, तेव्हा त्याच्यावरुन तुम्ही नजर हटवू शकत नाही, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisement -

शमीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला ६६ धावांच्या मोबदल्यात केवळ १ गडी बाद करता आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -