बीसीसीआयची मोठी घोषणा, जसप्रीत बुमराहऐवजी ‘या’ खेळाडूला मिळणार टी-20 विश्वचषकात संधी

भारताचा स्टार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने एका तगड्या गोलंदाजाला संधी दिली आहे. हा गोलंदाज आपल्या शैलीतून सामन्याचा मार्ग बदलू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हा खेळाडू रोहित शर्माला उत्तम साथ देऊ शकतो.

कोण आहे हा गोलंदाज?

बीसीसीआयने जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला भारतीय संघात संधी दिली आहे. शमी त्याच्या किलर बॉलिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे तो टीम इंडियासाठी फायदेशीर ठरू शकतो.

मोहम्मद शमी डावाच्या सुरुवातीला अत्यंत किलर गोलंदाजी करतो. आशिया कपमधील डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीमुळे टीम इंडियाला अडचणीचा सामना करावा लागला होता. तर शमी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यात निष्णात खेळाडू आहे.

टीम इंडियाने जिंकले अनेक सामने

मोहम्मद शमीने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची चार षटकं पराभव आणि विजयातील फरक ठरवतात. स्विंग आणि रिव्हर्स स्विंगमध्ये तो मास्टर आहे. त्याने टीम इंडियासाठी 17 टी-20 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. तो फलंदाजांना त्याच्याविरुद्ध मोकळेपणाने खेळू देत नाही. शमीने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना नामिबियाविरुद्ध खेळला होता.


हेही वाचा : IND vs PAK : 2027पर्यंत भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी कोणतीही मालिका खेळणार नाही