घरक्रीडाशमीची फिटनेस हेच माझे यश!

शमीची फिटनेस हेच माझे यश!

Subscribe

क्रिकेटच्या थकवणार्‍या वेळापत्रकामुळे खेळाडूंनी आपल्या फिटनेसवर आता अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. फिटनेसवर सर्वाधिक लक्ष देणार्‍या क्रिकेटपटूंमध्ये अव्वल क्रमांक लागतो भारताचा कर्णधार विराट कोहलीचा. तो फिटनेसवर भर देत असल्यामुळे भारतीय संघातील इतर खेळाडूही त्याच्याकडून प्रेरणा घेतात. मात्र, काही खेळाडूंना फिट होण्यासाठी इतर खेळाडूंपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. यापैकीच एक आहे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी.

शमीला मागील वर्षी यो-यो टेस्ट पास न झाल्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्याला मुकावे लागले, परंतु त्यानंतर त्याने फिटनेसवर मेहनत घेत भारतीय संघात पुनरागमन केले. सध्या तो या संघातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या फिटनेसमागे भारतीय संघाचे ट्रेनर शंकर बासू यांचा मोठा हात आहे. शमी इतका फिट होणे हेच माझे खरे यश आहे, असे बासू म्हणाले.

- Advertisement -

शमी इतका फिट होणे हे माझे खरे यश आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तुम्ही विचार करा, मागील वर्षीच तो फिटनेस चाचणी पास होऊ शकला नव्हता आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही काही समस्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याने खूप मेहनत घेतली. त्याने जेव्हा सराव करण्यास सुरुवात केली, तेव्हा मी त्याला म्हणालो होतो की २० दिवस मेहनत करून फायदा नाही. तुला सातत्याने सराव करण्याची गरज आहे. त्याने माझी गोष्ट मनावर घेतली आणि आता फिटनेसवर मेहनत घेणे हा त्याच्या आयुष्याचा भाग बनला आहे, असे बासू म्हणाले.

तसेच कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसबाबत बासू यांनी सांगितले, विराट हा खूप चांगला शिष्य आहे. अगदी कंटाळवाण्या गोष्टीही मनापासून करणे हा त्याचा सर्वोत्तम गुण आहे. तो शरीराची योग्य काळजी घेतो. सराव करताना तो मला १०० प्रश्न विचारतो, पण त्यांचे उत्तर मिळाल्यावर तो मन लावून सराव करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -