घरक्रीडाShane Warne : पहिली टेस्ट विकेट ते पहिली IPL ट्रॉफी, शेन वॉर्नचे...

Shane Warne : पहिली टेस्ट विकेट ते पहिली IPL ट्रॉफी, शेन वॉर्नचे इंडिया कनेक्शन

Subscribe

फिरकीचा जादुगार शेन वॉर्नचे शुक्रवारी ह्दयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. नेहमीच विरोधी संघाच्या खेळाडूंमध्ये आपल्या गोलंदाजीने धडकी भरवणाऱ्या शेन वॉर्नच्या योगदानाला संपूर्ण जगभरातील खेळाडूंनी मानवंदना आणि श्रद्धांजली दिली आहे. अनेक वादाच्या प्रकरणातही शेन वॉर्नचा नाव हे क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही येत राहिले. पण भारतासोबत मात्र शेन वॉर्नचे नात अतिशय जवळचे होते. शेन वॉर्नने भारताविरोधातच टेस्ट डेब्यू केला होता. या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात शेन वॉर्नला एक विकेटही मिळाली होती. ही पहिली विकेट रवी शास्त्री या भारतीय खेळाडूची होती. त्यानंतर भारतात पहिल्यांदा जेव्हा आयपीएल खेळवण्यात आले तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघाचे नेतृत्व हे शेन वॉर्नने केले होते. आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद हे राजस्थानने मिळवले. शेन वॉर्न कर्णधार असतानाच ही पहिली आयपीएल स्पर्धा शेन वॉर्नने जिंकले होती.

शेन वॉर्नने १९९२ साली ऑस्ट्रेलिया संघासाठी डेब्यू केला होता. त्यानंतर १४५ कसोटी सामन्यात ७०८ विकेट्सचा विक्रम आपल्या नावावर शेन वॉर्नने केला. त्यानंतर १९४ वनडे सामन्यात २९३ विकेट्स घेतले. १९९३ साली २४ वर्ष वय असताना शेन वॉर्नने ओल्ड ट्रेफर्डमध्ये ज्या बॉलवर इंग्ल्ंडच्या माइक गैटिंगला आऊट केले होते, त्याला बॉल ऑफ द सेंच्यूरी म्हणून संबोधित करण्यात आले होते. ज्यावेळी ही फिरकी गोलंदाजीची कला नामशेष होण्याच्या मार्गावर होती, तेव्हा शेन वॉर्नच्या गोलंदाजीने एक फिरकी गोलंदाजीला संजीवनी दिली होती. शतकातील सर्वात पाच महान क्रिकेटपटूंना निवडण्यात आले, त्यामध्ये डॉन ब्रॅडमन, जॅक हॉब्स, गॅरी सोबर्स आणि विवियन रिचर्ड्सच्या नावासोबतच श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्नच्या नावाचाही समावेश होता.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या संन्यासानंतर आयपीएल

भारताविरोधात सिडनी क्रिकेट गाऊंडवर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या शेन वॉर्नला १९९२ ते २००७ या कालावधीतील त्यांच्या सर्वोच्च कामगिरीसाठी विजडनने शतकाली पाच मुख्य खेळाडंमध्ये निवडले होते. तसेच आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्येही शेन वॉर्नची निवड झाली होती. १९९९ साली जेव्हा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा शेन वॉर्न ऑस्ट्रेलियन संघात योगदान दिले होते. एशेज सिरीजमध्ये सर्वाधिक १९५ विकेट्स शेन वॉर्नने घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अलविदा केल्यानंतर राजस्थान रॉयल्स फ्रॅंचायसीसाठी सुरूवातीला कॅप्टन आणि नंतर कोच म्हणून जबाबदारी शेन वॉर्नने पार पाडली. मैदानाच्या बाहेर कॉमेंटेटर म्हणूनही जबाबदारी शेन वॉर्नने पार पाडली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -