इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी जो रुट शेन वॉर्नच्या मागे होता; इंग्लंडचे माजी गोलंदाज डॅरेन गॉफ यांचा खुलासा

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियानं पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला १४६ धावांनी धूळ चारून अ‍ॅशेस मालिकेत ४-० असं यश संपादन केलं. त्यावेळी इंग्लंडचा दुसरा डाव १२४ धावांत संपुष्टात आणून ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशीच ही लढत जिंकली होती. मात्र या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका २०२१-२२च्या परभवापूर्वी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट याला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यानं इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षकपद व्हावं असं वाटत होतं. विशेष म्हणजे यासाठी शेन वॉर्न इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक व्हावा यासाठी त्याच्या सतत मागणी करत असल्याचा खुलासा इंग्लंडचे माजी जलद गोलंदाज डॅरेन गॉफ यांनी केला.

“वॉर्नला इंग्लंडचे प्रशिक्षक व्हायचे होते, परंतु ऑस्ट्रेलियाबद्दलची त्याची निष्ठा त्याला आडवी येत होती”, असं डॅरेन गॉफ यांनी टॉकस्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. तसंच, “जो रूटनं मागच्या हिवाळ्यात अॅशेसच्या तयारीत वॉर्नीला इंग्लंडचे प्रशिक्षक बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि वॉर्नी, तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरील हास्याची कल्पना करू शकता. तुम्ही बघू शकता की त्याला ते करायचे होते, पण ऑस्ट्रेलियावरही त्याची निष्ठा कायम होती” असंही डॅरेन गॉफ यांनी म्हटलं.

“पण जो रुट त्याला सतत विचारत होता. त्यावेळी मला असं वाटत होतं की आता वॉर्न जवळपास इंग्लंडच्या प्रशिक्षक पदाचा विचार करतोय. मात्र, त्यावेळी वॉर्न म्हणाला ‘मला याबद्दल विचार करू द्या, आणि मी तुला फोन करीन.’ त्यानंतर स्पर्धा संपल्यानंतर २ दिवसांनी वॉर्नीने मला मजकूर पाठवला की, ‘तुला जोचा नंबर मिळाला का? मी त्याचा नंबर घ्यायला विसरलो’, वॉर्नीच्या या म्हणण्यानंतर मला वाटलं की तो आता इंग्लडचा प्रशिक्षक होतोय की काय, मात्र तसं काही झालं नाही,”.

तो पुढे म्हणला, “माजी कर्णधार अँड्र्य स्ट्रॉस आणि पॉल कॉलिंगवूड हे सध्या अॅशले जाईल्स आणि ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या बाहेर पडल्यानंतर अनुक्रमे क्रिकेटचे संचालक आणि प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडत आहेत. ऑस्ट्रेलियात इंग्लंडच्या ४-० च्या अ‍ॅशेस पराभवानंतर सिल्व्हरवुडच्या प्रस्थानामुळं कॉलिंगवूड बॅकरूम संघातील सर्वोच्च रँकिंग सदस्य बनला.

सिल्व्हरवुडची हकालपट्टी झाल्यानंतर, वॉर्नने त्याच्या मित्रांना इंग्लंडचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. तसंच, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटींग म्हणाला की, त्याची खेळाबद्दलची आवड आणि ज्ञान पाहण्यासारखे आहे. त्यानं एक उत्तम प्रशिक्षक बनवला असता. ज्याने वॉर्नसारखी इंग्लंड क्रिकेट संघाची धुरा सांभाळली असती. मला वाटते की त्याने खूप चांगलं काम केलं असतं” असं रिकी पॉन्टिंगनं ‘द आयसीसी रिव्ह्यू’वर सहकारी प्रसारक इसा गुहा यांना सांगितलं होतं.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचं ४ मार्च रोजी थायलंडमध्ये निधन झालं. तसंच, ३० मार्चला त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. वयाच्या ५२ व्या वर्षी शेन वॉर्नचं हार्ट अटॅकनं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कारावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहिले होते.


हेही वाचा – Women’s World Cup 2022: इंग्लंडचा पराभव; ऑस्ट्रेलियानं सातव्यांदा पटकावले महिला विश्वचषकाचे जेतेपद