घरक्रीडावॉटसनचे एका पायावर शतक

वॉटसनचे एका पायावर शतक

Subscribe

आयपीएलच्या अंतिम फेरीच्या सामन्यात चेन्नईच्या शेन वॉटसनने तुफानी फटकेबाजी केली. शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले. वॉटसनच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण या खेळीपूर्वी वॉटसन हा दुखापतग्रस्त होता, हे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्याच्या एका पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने एका पायावर उभे राहून शतक झळकावले.

वॉटसनने धडाकेबाज शतक
आयपीएलच्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या होत्या. हैदराबादचे बलस्थान गोलंदाजी असल्यामुळे चेन्नईला हे आव्हान पेलवता येणार नाही, असे वाटले होते. त्यामध्येच हैदराबादचा मध्यमगती स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारने वॉटसनला पहिले शतक निर्धाव टाकले होते. त्यामुळे चेन्नईचा संघ हा सामना जिंकू शकत नाही, असे कुणालाही वाटले नव्हते. पण त्यानंतर वॉटसनने धडाकेबाज शतक झळकावले आणि संघाला जिंकवून दिले.

- Advertisement -

जेव्हा वॉटसन फलंदाजी करण्यासाठी जातो
हैदराबादच्या धावांचा पाठलाग करताना जेव्हा वॉटसन फलंदाजी करण्यासाठी जात होता, तेव्हा जायबंदी होता. त्याच्या एका पायाचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे फक्त एका पायावर उभे राहून तो फलंदाजी करत होता. वॉटसनची फटकेबाजी पाहून तो जायबंदी असतानाही, असे फटके मारू शकतो, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण एका पायावर उभं राहून वॉटसनने यावेळी चेन्नईला विजय मिळवून दिला.

वॉटसन जायबंदी होता, हे ड्वेन ब्राव्होने सामन्यानंतर सांगितले आणि साऱ्यांनाच धक्का बसला. ब्राव्हो म्हणाला की, “आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. कारण गेली दोन वर्षे आम्ही एकत्र खेळू शकलो नव्हतो. हा विजय कुशल नेतृत्व आणि संघ भावनेचा आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगितली की, कदाचित विश्वास बसणार नाही, वॉटसनने शतक साकारले, पण ते फक्त एका पायावर उभे राहून, कारण त्याच्या एका पायाचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे फक्त एका पायावर उभा राहून त्याने हे शतक साकारले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -