Homeक्रीडाShardul thakur : शार्दुल ठाकूरचे नाबाद शतक, मुंबईला पुन्हा एकदा संकटातून सावरले

Shardul thakur : शार्दुल ठाकूरचे नाबाद शतक, मुंबईला पुन्हा एकदा संकटातून सावरले

Subscribe

जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात पाच सत्रांपासून मुंबई संघ पिछाडीवर होता. मात्र आज दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात शार्दुल ठाकूरच्या दमदार शतकामुळे आणि तनुश कोटियन याच्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईने सध्या तरी पराभव टाळला आहे.

मुंबई : जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात पाच सत्रांपासून मुंबई संघ पिछाडीवर होता. मात्र आज दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात शार्दुल ठाकूरच्या दमदार शतकामुळे आणि तनुश कोटियन याच्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईने सध्या तरी पराभव टाळला आहे. दुसऱ्या डावात 101 धावांत 7 विकेट गमावलेल्या मुंबईने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेट गमावत 274 धावा केल्या आहेत. शार्दुल ठाकूरने 119 चेंडूत 17 चौकारांच्या मदतीने 113 धावांवर नाबाद आहे. तर तनुषनेही 119 चेंडूंचा सामना करत 6 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. (Shardul Thakur century gives Mumbai team lead in Ranji Trophy match)

रोहित शर्मा (28) आणि यशस्वी जयस्वाल (26) यांनी दुसऱ्या डावात मुंबईला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 54 धावांची जलद भागीदारी केली, परंतु ही भागीदारी तुटल्यानंतर संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. श्रेयस अय्यर (17) आणि अजिंक्य रहाणे (16) बाद झाल्यानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद 54 वरून 7 बाद 101 अशी झाली. पण शार्दुल आणि कोटियन यांनी नाबाद 150 हून अधिक धावांची भागीदारी करून डाव सावरला.

शार्दूल ठाकूरची अष्टपैलू खेळी 

दरम्यान, एका बाजूने मुंबईच्या विकेट पडत असताना शार्दूल ठाकूरने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतली. गुरुवारी अर्धशतकी खेळी करणाऱ्या शार्दूलने आज तनुष कोटियनच्या साथीने आधी डाव सावरला, मग फटकेबाजीला सुरुवात केली. शार्दूलने आजही आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवले. खणखणीत शतकाच्या जोरावर शार्दूल ठाकूरने मुंबईला समाधानकारक आघाडी मिळवून दिली. तर दुसरीकडे आर अश्विनचा वारसदार समजल्या जाणाऱ्या फिरकीपटू तनुष कोटियनने अर्धशतक करत शार्दुलला चांगली साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 173 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे 86 धावांनी पिछाडीवर असलेल्या मुंबईने आता 188 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी मुंबईचे फलंदाज आपली आघाडी 300 हून धावांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील. जर असे मुंबई हा सामना सहज जिंकू शकेल.

हेही वाचा – Ankit Bawne : क्रिकेटपटूनं पंचांना विरोध करत घातला वाद, BCCI नं थेट घातली बंदी; नेमकं प्रकरण काय?

शार्दुलचा आंतरराष्ट्रीय कारकीर्द

दरम्यान, वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू शार्दुल ठाकूर बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. शार्दुलने डिसेंबर 2023 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर शार्दुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत दिसला होता. शार्दुलने भारतासाठी आतापर्यंत 11 कसोटी, 47 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 129 विकेट्स घेण्याव्यतिरिक्त 729 धावा केल्या आहेत.