घरक्रीडाIPL auction 2022 : मुंबईकर Lord शार्दुल ठाकुर मालामाल ! दिल्ली...

IPL auction 2022 : मुंबईकर Lord शार्दुल ठाकुर मालामाल ! दिल्ली कॅपिटल्स पंजाबमध्ये रंगली कोट्यावधींची बोली

Subscribe

गेल्या काही सामन्यांमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा शार्दुल ठाकुरला यंदाच्या आयपीएल लिलाव प्रक्रियेत लॉटरी लागली आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून आतापर्यंत खेळणाऱ्या शार्दुल ठाकुरने चांगला परफॉर्मन्स दिला आहे. पण यंदाच्या आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने लावललेल्या बोलीमुळे शार्दुल ठाकुर कोट्यावधींचा खेळाडू ठरला आहे. मिडियम पेस बॉलिंग आणि बॅटिंग करणाऱ्या शार्दुल ठाकुरला यंदाच्या IPL लिलावात चांगली बोली लागली. याआधीच्या भारतीय संघाच्या दौऱ्यात शार्दुलने चमकदार कामगिरी केली होती. पण यंदाच्या आयपीएलच्या मौसमात शार्दुल ठाकुर दिल्लीकडून खेळताना दिसणार दिसेल. मूळ मुंबईचा असणाऱ्या शार्दुल ठाकुरने परदेश दौऱ्यातही चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये शार्दुलने संघाला गरज असताना दबावातही चांगले योगदान दिले आहे.

- Advertisement -

दिल्ली कॅपिटल्सनेही लॉर्ड शार्दुल ठाकुरचे ग्रॅण्ड वेलकम केले आहे. आम्ही देवाच्या मागे जातोय, अशा शब्दात दिल्ली कॅपिटल्सने ट्विट केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकुरला १० कोटी ७५ लाख इतकी रक्कम लिलाव प्रक्रियेत बोली लावली. भारतीय संघातील मध्यमगती गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकुरला चांगली बोली लावण्यात आली. भुवनेश्वर कुमारला ४ कोटींची बोली लागली. महत्वाचे म्हणजे ओव्हरसिज परदेशी खेळाडूंच्या तुलनेत शार्दुल ठाकुरला चांगली बोली लागली आहे. ऑस्ट्रेलिय गोलंदाज जॉश हेजलवुलसाठी ७ कोटी ७५ लाखांची बोली लागली. तर भुवनेश्वर कुमार ४ कोटी २० लाखांची बोली लागली. मुत्झफिझुर रेहमान या बांगलादेशी वेगवान गोलंदाचाही समावेश दिल्ली कॅपिटल्सने २ कोटींचा लिलाव करत संघात केला आहे. तर कुलदीप यादवलाही २ कोटींची बोली लावण्यात आली.

- Advertisement -

पंजाब आणि दिल्लीमध्ये शार्दुल ठाकुरसाठी जोरदार स्पर्धा लिलाव प्रक्रियेत झाल्याचे पहायला मिळाले. जवळपास दुप्पट अशी लिलावातील बोली शार्दुल ठाकुरसाठी लावण्यात आली. गुजरात आणि दिल्लीनेही शार्दुलसाठी जोरदार बोली लावली. पण खरी स्पर्धा ही दिल्ली आणि पंजाबमध्येच होती. चेन्नईने ६ कोटींपेक्षा अधिक बोली लागल्यानंतर लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. पण पंजाबने सातत्याने या लिलावात स्पर्धा केली. पण १० कोटींपेक्षा अधिक बोली लागल्यानंतर सीएसके लिलाव प्रक्रियेतून मागे हटले. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबमध्ये स्पर्धा लागली. त्यानंतर पंजाबला मागे टाकत दिल्लीने ही लिलाव प्रक्रियेत बाजी मारली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -