घरक्रीडादुखापतीमुळे शार्दूल ठाकूरला ८ आठवडे विश्रांती, ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार

दुखापतीमुळे शार्दूल ठाकूरला ८ आठवडे विश्रांती, ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार

Subscribe

वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये एक कसोटी मालिका खेळवण्यात आली असून भारताने ती जिंकली होती. आता दोन्ही संघांमध्ये पाच वन डे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. उभय देशांमधील कसोटी मालिकेत नवोदीत खेळाडू शार्दूल ठाकूर याचे पदार्पण झाले. परंतु या सामन्यात त्याला मोठी दुखापत झाली होती. या दुखापतीमधून शार्दूल अद्याप बरा झालेला नाही. शार्दूलला दुखापतीमुळे ७ ते ८ आठवडे क्रिकेटपासून वंचित रहावे लागणार आहे.

- Advertisement -

वेस्ट इंडिजसोबतची एकदिवसीय मालिका संपलल्यानंतर दोन्ही देशांमध्ये दोन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिकादेखील खेळवली जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. शार्दूलला ७ ते ८ आठवडे विश्रांती घ्यायला सांगितल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-ट्वेंटी मालिका आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांपर्यंत तो भारतीय संघासाठी उपलब्ध नसेल. शार्दूलला तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत पुनरागमन करेल असा विश्वास वाटतो. आता सरावाला प्राधान्य देणार असल्याचे शार्दूलने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -