घरक्रीडाIND vs NZ : शशी थरूर म्हणतात कर्णधारच बदला, का केली मागणी...

IND vs NZ : शशी थरूर म्हणतात कर्णधारच बदला, का केली मागणी ?

Subscribe

भारत विरूध्द न्यूझीलंडच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयश अय्यर असावा असे शशी थरूर यांनी म्हटले

भारत विरूध्द न्यूझीलंडच्या टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. विजयासोबत भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेत सामन्यावर कब्जा मिळवला. पुढील सामना रविवारी कोलकत्ताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. दरम्यान या सामन्यात रोहितची सेना विजयाची हॅट्रिक करून संघाचा विजयरथ चालू ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. तर शुक्रवारी रांचीच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्याला पाहण्यासाठी भारतीय चाहते खूप उत्सुक होते. अशातच कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी देखील सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. भारताच्या विजयानंतर शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला सोबतच पुढच्या सामन्यात कर्णधार वेगळा असावा असे त्यांनी बीसीसीआयला सुचवले.

शशी थरूर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, “भारत टी-२० मालिका जिंकतो आहे हे बघताना खूप आनंद झाला. पुढच्या सामन्यात अशा लोकांना विश्रांती द्यायला हवी ज्यांनी या सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे. जेणेकरून रोहित शर्मा, के.एल राहुल, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरला आराम मिळेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे”.

- Advertisement -

६५ वर्षीय शशी थरूर त्या कॉंग्रेस नेत्यांमध्ये अग्रेसर आहेत जे ट्विटरवर सतत आपली भूमिका मांडत असतात. अनेक वेळा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. थरूर यांनी २००६ मध्ये युनायटेड नेशन्स (UN) च्या सरचिटणीसपदाची निवडणूक लढवली पण विजयी होऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी भारतीय राजकारणात सक्रिय होत कॉंग्रेसचे सदस्यपद मिळवले.

- Advertisement -

हे ही वाचा: IPL 2022 : IPL च्या ३ संघांकडून विदेशी टी-२० लीगमध्ये संघांची खरेदी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -