WOMEN’S ICC T20I RANKINGS : शेफाली वर्मा पहिल्या स्थानावर

आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत पहिलं स्थान

आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत पहिलं स्थान

आयसीसीने मंगळवारी महिला आंतरराष्ट्रीय टी-२० ची क्रमवारी घोषित केली. या क्रमवारीत भारताची युवा स्टार फलंदाज शेफाली वर्मा पहिल्या स्थानावर आहे, तर न्यूझिलंडच्या सोफी डिवाइननं आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी दुसऱ्या, तर भारताची स्मृती मंधाना ७१६ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेग लॅनिंग चौथ्या क्रमांकावर आणि फलंदाजांच्या यादीत सोफी पाचव्या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर भारताच्या दोन खेळाडूंचाही गोलंदाजी क्रमवारीत समावेश आहे. दीप्ती शर्मा ७०३ रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे. तर पूनम यादव ६७० रेटिंगसह आठव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५० धावा काढण्याव्यतिरिक्त सोफीने २६ धावा देऊन दोन विकेट्सही घेतल्या. या कामगिरीमुळे तीने अष्टपैलूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, भारताच्या दीप्ती शर्माने अष्टपैलूंच्या यादीत एक स्थान जास्त मिळवले आहे आणि ती चौथ्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा : ENG VS IND TEST SERIES : रवींद्र जडेजाचा इंग्लंड विरुद्ध पराक्रम